मुंबई । मागील महिन्यात पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांत अम्फान या विध्वंसक वादळाने धुमाकूळ घातला होता. 150 किमी वेगाने वाहणार्या या वाऱ्यामुळे समुद्र किनारपट्टीवर असलेल्या लोकांचे प्रचंड नुकसान झाले. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. लोकांचं होतं नव्हतं ते वाहून गेलं. परिणामी अनेकांचे संसार उघड्यावर पडले.
अशा संकटग्रस्त लोकांच्या मदतीसाठी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली मदतीसाठी धावून आला आहे. त्याने त्याच्या ‘सौरव गांगुली फाउंडेशन’ आणि चीनी कंपनी शायोमीच्या मदतीने लोकांची मदत करण्यासाठी एक अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून दहा हजार लोकांच्या कुटुंबांना मदत करण्यात येत आहे.
गांगुलीने ट्विटरच्या माध्यमातून माहिती देताना सांगितले की, “काही प्रसंग आपली परीक्षा घेतात. या कठीण परिस्थितीतून बाहेर करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. बंगालमध्ये या विध्वंसक वादळी वाऱ्याचा मोठा परिणाम झाला. मी माझ्या फाऊंडेशनच्या माध्यमातून दहा हजार कुटुंबांना मदत करत आहे.”
Some innings really test you, have to dig deep to come out!
Bengal was hit by the worst cyclone, devastation was there to see. Shook us all to the core.
In this difficult times @XiaomiIndia& along with my foundation helps 10K affected families.#WestBengal @manukumarjain pic.twitter.com/k8JnOoc8Ng— Sourav Ganguly (@SGanguly99) June 12, 2020
यापूर्वी सौरव गांगुलीने कोरोना व्हायरसच्या संकटावेळीही मदत केली होती. त्याने गरजू लोकांना पन्नास लाख रुपयांचे तांदूळ वाटले होते. यासोबतच इस्कॉन संस्थेच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती.
ट्रेंडिंग घडामोडी –
बाबर आझमला ‘या’ भारतीय खेळाडूबरोबर करायची आहे सलामीला फलंदाजी
…म्हणून हरभजन सिंगने मागितली देशभरातील डॉक्टरांची माफी
दारुच्या नशेत असा करतात भांगडा! मनदीप सिंगचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल