इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 हंगामा सुरू होण्यासाठी अजून काही महिने वेळ बाकी आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात अपयशी संघ ठरला आहे. धोनी आगामी आयपीएल हंगामात खेळण्यासाठी उत्सुक आहे आणि त्याने यासाठी तयारीला देखील सुरुवात केली आहे. तत्पूर्वी एमएस धोनी आणि भारताचे माजी दिग्गज सौरव गांगुली यांची भेट झाली.
भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असा एमएस धोनी (MS Dhoni) याचा उल्लेख केला जातो. तर सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या बाबतीत देखील अगदी हीच गोष्ट लागू होते. गांगुली मागच्या काही वर्षांमध्ये चाहत्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अध्यक्षाच्या रूपात देखील दिसले. मागच्या वर्षी रॉजर बिन्नी यांच्या रूपात बीसीसीआयला नवीन अध्यक्ष मिळाल्यानंतर गांगुलींनी हे पद सोडले. सध्या गांगुली त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटावर काम करत असल्याचे सांगितले जात आहे. याच संदर्भात त्यांनी एमएस धोनीची भेट घेतली असू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. माहितीनुसार दोघांची भेट चेन्नईमध्ये झाली.
चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून या दोघांचे हे पोटो शेअर करण्यात आले आहेत. या सोशल मीडिया पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले गेले आहे की, “जेव्हा प्रिंस आणि सुपर किंग यांची भेट होते…” धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. मुंबई इंडियन्स संघानंतर चेन्नई दुसरा सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकणारा संघ आहे. मुंबईने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे.
When the Prince met the Super King! 🦁#WhistlePodu #Yellove 🦁💛@SGanguly99 @msdhoni pic.twitter.com/Mii4xjzlbp
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) February 3, 2023
सौरव गांगुलीनी नुकतीच काही दिवसांपूर्वी त्यांच्या बायोपिकविषयी महत्वाची माहिती दिली. या बायोपिकसाठी लीड एक्टर आणि कास्टविषययी अद्याप कुठलीच ठोस माहिती समोर आली नाहीये. गांगुलींनी स्वतः या बायोपिकसाठी स्क्रिप्ट लिहिली आहे आणि प्रक्षकांकडून चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. यापूर्वी धोनीच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आला होता आणि सुपरहिट देखील झाला होता. धोनीने अजूनही आयपीएल खेळत असला तरी क्रिकेटव्यतिरिक्त त्याने काही व्यवसाय देखील सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वीच धोनीच्या फिल्म प्रोडक्शन कंपनीचे उद्घाटन करण्यात आले. अशातच आता गांगुली आणि धोनीची भेट झाल्यानंतकर असा अंदाज व्यक्त होत आहे की, गांगुलींच्या सिनेमाची निर्मिती धोनीच्या प्रोडिक्शन हाऊस अंतर्गत होऊ शकते. (Sourav Ganguly and MS Dhoni met)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्राच्या मुष्टीयोध्दांचे अचूक ठोसे, चार खेळाडू अंतिम फेरीत, दोन खेळाडूंना कांस्यपदक
खेलो इंडिया युथ गेम्स 2022-23 | महाराष्ट्राची नाईशा ठरली बॅडमिंटनमध्ये रौप्य पदकाची मानकरी; पदार्पणात जिंकले पदक