भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आज ४६ व्या वर्षात पदार्पण करतोय.
भारतीय क्रिकेटला २००० च्या दशकात नवी ओळख मिळवून देणाऱ्या सौरव गांगुलीला भारताचा एक यशस्वी कर्णधार मानले जाते.
सौरव चंडिदास गांगुली एक बंगाली क्रिकेटर. खरतर बंगाली माणसे म्हणजे शांत माणसे. परंतु हा एक अवलिया क्रिकेटमधला सर्वात आक्रमक कर्णधार म्हणून ओळखला जातो. विसाव्या दशकाच्या सुरुवातीलाच मॅच फिक्सिंगच प्रकरण चव्हाट्यावर आले आणि भारतीय संघातील खेळाडूंवर सुध्दा आरोप झाले. अशा वेळी त्या काळात नवख्या असणाऱ्या गांगुलीकडे कर्णधारपद सोपवले गेले.
आपल्या खेळाबरोबरच आक्रमक स्वाभावाच्या बंगालच्या या टायगरने आपल्या कर्णधार पदाच्या कारकिर्दीत साऱ्या जगाला भारतीय क्रिकेटची दखल घ्यायला भाग पाडले.
संघातील जुन्या नव्या खेळाडूंना एकत्र करुन एक मजबून संघ बनवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती आणि त्याने ती चोख बजावली. आक्रमक, दर्जेदार अशा खेळाडूंना पारखण्यामध्ये तो तरबेज होता. सचिन, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग आणि तो स्वतः ह्या पंचकाला त्यावेळी मोठे मोठे गोलंदाज घाबरायचे. युवराज, गंभीर पासून ते धोनी पर्यंत अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्याचे कामही त्याने चोख बजावले.
विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहिर खान आणि हरभजन सिंग यांची क्रिकेट कारकिर्द सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखालीच बहरली.
तो खेळाडू म्हणूनही तेवढाच आक्रमक होता. एक अष्टपैलू खेळाडू संघाला गरज असताना कितीतरी वेळा आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्याने सुखरुप बाहेर काढले तसेच गोलंदाजीनेही त्याने अनेकवेळा सामने जिंकण्यास मदत केलीय.
हा डावखुरा फलंदाज अॉफ साईडला फटके मारण्यात एवढा पटाईत होता की त्याला भारतीय क्रिकेट संघाची द वाल समजल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने “अॉफसाईडचा देव” अशी उपाधी दिली होती.
२००५ साली गांगुली, प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्याशी वाद झाल्यानंतर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या निचांक स्थानी होता. त्यानंतर भारतीय संघातील स्थान गमावलेल्या गांगुलीने हार मानली नाही. हार मानेल तो गांगुली कसला.
२००६ सालच्या मध्याला भारतीय संघात पुनरागमन केलेल्या सौरव गांगुलीने २००७ साली कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये १००० पेक्षा अधिक धावा करत दिमाखात पुनरागमान केले.
कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिळून २००७ साली गांगुली २,३३४ धावा करत त्या वर्षीचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याच्या या कामगिरी साठी २००८ सालचा सर्वोत्तम एशियन फलंदाजाचा पुरस्कार त्याला मिळाला होता.
भारतीय क्रिकेटला सर्वोच्च स्थानी घेऊन जाणाऱ्या सौरव गांगुलीने २००९ साली दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली.
निवृत्ती नंतर सौरव गांगुली आता बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा वाहतोय.
अशी आहे सौरव गांगुलीची क्रिकेट कारकिर्द-
११३ कसोटी सामन्यात गांगुलीने ४२.१८ च्या सरासरीने ७,२१२ धावा केल्या आहेत. यामध्ये ३५ अर्धशतके १६ शतकांचा समावेश आहे.
भारतासाठी गांगुललीने ३११ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४०.७३ च्या सरासरीने ११,३६३ धावा केल्या आहेत. यात ७२ अर्धशतके आणि २२ शतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-एशियन गेम्ससाठी भारतीय महिला आणि पुरुष कबड्डी संघाची घोषणा
-काय सांगता! धोनीवर पुन्हा चित्रपट बनणार?






