भारतीय क्रिकेटमधून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाशी संबंधित आहे. बीसीसीआयला आता नवीन अध्यक्ष मिळणार आहे. सध्या बीसीसीआयचे अध्यक्षपद सौरव गांगुली भूषवत आहे. मात्र, त्याच्या अध्यक्षपदाचे आता काही दिवसच शिल्लक राहिले असल्याचे बोलले जात आहे. लवकरच बीसीसीआयच्या सर्व पदांसाठी पुन्हा निवडणूक होणार आहे. मात्र, गांगुली पुन्हा या पदाचा दावेदार नसल्याची माहिती आहे. अशात बीसीसीआयचा नवीन अध्यक्ष कोण असेल, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
बीसीसीआयच्या (BCCI) नवीन अध्यक्षपदावर कोण विराजमान होणार, याबाबत दोन नाव सर्वात पुढे येत आहेत. या दोन नावांपैकी कुणा एकाची अध्यक्षपदासाठी निवड होण्याची शक्यता आहे.
येत्या 18 ऑक्टोबरला मिळणार बीसीसीआयला नवीन अध्यक्ष
बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही निवडणूक मुंबईत होणार आहे. यापूर्वी 11 आणि 12 ऑक्टोबरला दावेदार आपले नामांकन जमा करतील. त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी नामांकन पत्रांची तपासणी होईल. 14 ऑक्टोबरपर्यंत नावे परत घेता येऊ शकतील. तसेच, 15 ऑक्टोबरला नामांकन देणाऱ्यांची यादी जारी केली जाईल. त्यानंतर जर दोनपेक्षा जास्त दावेदार असतील, तर 18 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा अध्यक्ष बनण्याच्या मूडमध्ये नाहीये. तसेच, सचिव जय शाहदेखील अध्यक्ष बनण्याच्या शर्यतीत नाहीयेत. मात्र, ते पुन्हा सचिव पदासाठी पुन्हा अर्ज करत आहेत. अशातच अध्यक्ष पदासाठी जो दावेदार आहे, त्यामध्ये बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि भारतीय संघाचे माजी खेळाडू रॉजर बिन्नी यांची नावे समोर येत आहेत. असे म्हटले जात आहे की, याबाबत बैठकाही झाल्या आहेत, ज्यामध्ये बीसीसीआयचे अनेक दिग्गज सामील झाले होते.
राजीव शुक्ला आणि रॉजर बिन्नी यांच्यापैकी एक बनू शकतात नवीन अध्यक्ष
रॉजर बिन्नी यांचे नाव अचानकपणे समोर आले आहे. बिन्नी हे सन 1983 विश्वचषकात कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाचे सदस्य राहिले आहेत. हा पहिला वहिला वनडे विश्वचषक भारताने आपल्या नावावर केला होता. बिन्नी हे कर्नाटकचे रहिवासी आहेत. त्यांनी भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे, राजीव शुक्ला यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर ते सध्या उपाध्यक्ष आहेत. तसेच, दीर्घ काळापासून बीसीसीआयशी जोडले गेले आहेत. असे म्हटले जात आहे की, या दोघांपैकी एकजण बीसीसीआय अध्यक्ष बनू शकतात. तसेच, एकाला आयपीएल अध्यक्ष बनवले जाऊ शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या महिला गोलंदाजांपुढे फिकी पडली भारतीय फलंदाजी, चौथ्या सामन्यात टीम इंडिया ऑल आऊट
आता बॅटही धरता येणार नाही! टी-20 विश्वचषकाच्या तोंडावर न्यूझीलंडच्या अष्टपैलूला गंभीर दुखापत