यावर्षीचा वनडे विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे. अनेकांच्या मते यजमान भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघाचे काही माजी दिग्गज देखील याविषयी बोलले आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यानेही आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली.
भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या एका ट्वीटमुळे या चर्चांना सुरुवात झाली. विश्वचषक जिंकण्याइतपत भक्कम संघ भारताकडे आहे का? असा प्रश्न युवराजने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर विचारला. “आपल्या सर्वांना 2011 विश्वचषकाची पुन्हा एकदा प्रत्यक्षात घडवायचा आहे. पण 2011 मध्ये भारतीय संघ दबावाच्या परिस्थितीमध्ये चमकला होती. 2023 मध्येही संघाला अशी कामगिरी करता येईल का? आपण हा दबाव ‘गेम चेंजर’ म्हणून वापरू शकतो का?” असे ट्वीट युवराजने केले होते. अष्टपैलू खेळाडूच्या पोस्टवर माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने खात्री व्यक्त केली होती.
सेहवागने लिहिले की, “युवराज दबावाविषयी बोलायचे झाले, तर यावेळी आपण दबाव घेणार नाही तर देणार आहोत. अगदी विजेत्यांप्रमाणे. मागच्या 12 वर्षांमध्ये यजमान संघांनी विश्वचषक जिंकला आहे. 2011 मध्ये आपण मायदेशात जिंकलो. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने मायदेशात विजय मिळवला. 2019 मध्ये इंग्लंड जयमान होता आणि त्यांनी विश्वचषक जिंकला. आता 2023 मध्ये आपण तुफान आणू.”
सेहवाग आणि युवराजच्या या चर्चेत सौरव गांगुलीनेही उडी मारली आहे. गांगुलीलने आपल्या अधिकृत एक्स खात्यावरून पोस्ट केली की, “विश्वचषक भारतात होत आहे म्हणून आपण विजेतेपदासाठी दावेदार आहोत की, आपला संघ ताकद आणि आत्मविश्वासने खेळत आहे म्हणून असे म्हटले जात आहे? होय आपण ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियन संघाला मात दिली आहे. इंग्लंडविरिद्धची मालिका बरोबरीत सोडवली. पण त्यानंतर महत्वाच्या सामन्यांमध्ये आपण या दोन्ही संघाकडून पराभूत देखील झालो. माझ्या मते आपल्याकडे चांगला संघ आणि संधी आहे. पण 2023 विश्वचषकापूर्वी आपल्याला विजयाचा मार्ग पुन्हा धरावा लागणार आहे.”
दरम्यान, गांगुलीच्या या ट्वीटमधून असे स्पष्ट होते की, माजी दिग्गज भारतीय संघ सध्या करत असलेल्या प्रदर्शनावर समाधानी नाहीये. भारतीय संघाने मागच्या काही महिन्यांमध्ये काही महत्वाच्या मालिका गमावल्या असून ऐन वेळी संघातील खेळाडू अपयशी ठरले आहेत. असात वनडे विश्वचषकापूर्वी संघाला आपली लय मिलवणे गरजेचे दिसते. (Sourav Ganguly doubted that the Indian team will win the World Cup)
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! WC 2023 साठी नेदरलँड्सने घोषित केला 15 सदस्यीय संघ, ताफ्यात 2 अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन
वर्ल्डकपसाठी फॉर्ममध्ये नसलेला खेळाडू टीम इंडियात; दिग्गज म्हणाला, ‘तो लकीये, नाहीतर त्याच्या जागी…’