भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत तीनही स्वरूपात अप्रतिम कामगिरी केली आहे. याचे कारण म्हणजे सौरव गांगुली (sourav ganguly) हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. त्यांनी हे पद स्वीकारल्यापासून अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राहुल द्रविडला (Rahul Dravid)मुख्य प्रशिक्षक पदावर आणण्यात सौरव गांगुलीने मोलाची भूमिका बजावली आहे. दरम्यान सौरव गांगुलीने एका शो मध्ये दिग्गज भारतीय फलंदाज भारतीय संघात जोडला जाण्याचे संकेत दिले आहेत.
सौरव गांगुलीने एका पत्रकाराच्या शोमध्ये हजेरी लावली होती. ज्यामध्ये त्यांनी संकेत दिले आहेत की, सचिन तेंडुलकर(sachin tendulkar) भारतीय संघाला जोडला जाऊ शकतो. त्यांनी म्हटले की, “सचिन तेंडुलकर या सर्व बाबतीत वेगळा आहे. त्याला या गोष्टींमध्ये सहभागी व्हायचं नाहीये. मला विश्वास आहे की, सचिन तेंडुलकर भारतीय संघासाठी आपले योगदान देत आहे, यापेक्षा चांगली गोष्ट कुठलीच नसेल. हे पाहावं लागेल की, आम्ही त्यांना कशाप्रकारे सहभागी करू शकतो. यासाठी आम्हाला मार्ग काढावा लागेल. कारण सर्वोत्तम व्यक्तिमत्त्वाला संघात आणण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम मार्गाची निवड करावी लागेल.”
सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर(India tour of South Africa) आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. २६ डिसेंबर पासून या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे. तर १९ जानेवारी २०२२ पासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे.
या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सौरव गांगुली आणि विराट कोहली(Virat Kohli) यांचा वाद पाहायला मिळाला होता. विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले आहे. याबाबत बोलताना सौरव गांगुली यांनी म्हटले होते की, “मी विराट कोहलीला कॉल करून टी२० संघाचे कर्णधारपद सोडू नको अशी विनंती केली होती.” यावर विराट कोहलीने म्हटले की, “८ डिसेंबर रोजी कसोटी मालिकेसाठी संघाची निवड करण्यात आली होती. ही बैठक होण्याच्या दीड तासांपूर्वी मला संपर्क करण्यात आला होता. त्यावेळी मला कर्णधार पदावरून काढून टाकण्याची माहिती देण्यात आली होती. टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर मला कोणी ही संपर्क केला नव्हता.”
महत्वाच्या बातम्या –
सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात धडाडणार ‘स्टेनगन’, सांभाळणार मोठी जबाबदारी! पाहा संपूर्ण स्टाफ