जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया भिडताना दिसत आहेत. इंग्लंड येथील ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या दोन दिवशी ऑस्ट्रेलियन संघाचे वर्चस्व राहिले. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने आपले पाच बळी गमावून 151 धावा केल्या आहेत. त्यावेळी भारतीय संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवण्यात ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलॅंड यशस्वी ठरला. त्याच्या गोलंदाजीने भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला चांगलेच प्रभावित केले.
ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या पहिल्या डावात मोठ्या धावा उभारल्यानंतर भारतीय संघाला त्याचे प्रत्युत्तर देणे गरजेचे होते. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या सर्वच वेगवान गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत भारतीय फलंदाजांना मनमोकळी फलंदाजी करू दिली नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने पाच गडी गमावत 151 धावा बनवल्या होत्या.
या सामन्यात जखमी जोश हेजलवूड याच्या जागी संधी मिळालेल्या स्कॉट बोलॅंडने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने 11 षटकात 29 धावा देत शुबमन गिलचा बळी मिळवला. यादरम्यान बोलॅंड याने एकाच टप्प्यावर गोलंदाजी करत भारताच्या सर्वच फलंदाजांना अडचणी टाकले. त्याच्या या गोलंदाजीमुळे प्रभावित झालेल्या गांगुली यांनी म्हटले,
“बोलॅंडने मला चांगलेच प्रभावित केले. वेद आणि योग्य टप्पा आहे. ही खेळपट्टी त्याच्या गोलंदाजी शैलीला मदत करणारी दिसते. त्यामुळे सर्व सामन्यात भारतीय संघाला त्याचेच आव्हान पेलावे लागेल.”
बोलॅंड हा ऑस्ट्रेलिया संघाचा नियमित सदस्य नाही. कमिन्स, स्टार्क व हेजलवूड हे ऑस्ट्रेलिया संघाचे प्रमुख वेगवान गोलंदाज असल्याने यापैकी कोणी अनुपलब्ध असल्यासच त्याला संधी मिळते.
(Sourav Ganguly Impressed With Scott Boland Bowling In WTC Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विक्रमवीर रोहित! 15 धावांवर बाद होऊनही रचला इतिहास, ICC Finalमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा एकटाच खेळाडू
ऑस्ट्रेलियाला हरवायचे असेल तर भारतीय संघाला दाखवावी लागेल 20 वर्षांपुर्वीची जादू… वाचा सविस्तर