आयपीएलच्या हंगामा नंतर भारताचा संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात 3 वनडे, 3 टी20 आणि 3 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. त्यामुळे हा दौरा थोडा मोठा आहे. यामुळे खेळाडूंसाठी एक विशेष सूट देण्याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एक सुतोवाच नुकतेच केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष सुनील जोशी यांनी सोमवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ जाहीर केला. या दौऱ्यावर अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे. जे खेळाडू या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या परिवाराला देखील त्यांच्या समवेत ऑस्ट्रेलियाला जाण्याची अनुमती देण्याबाबत विचार केला जात आहे, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले आहे.
सध्या काही खेळाडूंचे कुटुंबीय आयपीएलच्या चालू हंगामात त्यांच्याच समवेत युएई येथे सुरक्षितपणे राहत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला देखील ते तितकेच सुरक्षितपणे जाऊ आणि राहू शकतात. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड त्यांची राहण्याची आणि इतर सर्व सोय करणार असल्याचेही सौरव गांगुली यांनी सांगितले आहे.
विराट कोहली हा एका कसोटी सामन्याला मुकू शकतो. कारण त्याची पत्नी अनुष्का ही केव्हाही आपल्या पहिल्या अपत्याला जन्म देऊ शकते. याबाबत सौरव गांगुली पुढे म्हणाले की, “ही बाब मला बोलायला नको कारण ती खाजगी बाब आहे”.
टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या –
२०२१ मध्ये ‘हा’ खेळाडू करणार सीएसकेचं नेतृत्त्व, संघ व्यवस्थापनाने केला खुलासा
“जस्टिस फॉर सुर्यकुमार यादव”, टीम इंडियात संधी न मिळाल्याने चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
रोहितच्या फॅन्सला ‘ही’ गोष्ट समजणे गरजेचं, माजी क्रिकेटपटूचे संघव्यवस्थापनावर ताशेरे
ट्रेंडिंग लेख
कुमार संगकारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बावनकशी सोनं
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
आयपीएलमध्ये डंका वाजलाच, आता ‘मिशन ऑस्ट्रेलिया’; ‘हा’ आर्किटेक्ट बांधणार संघाच्या विजयाचा पूल