येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ (Indian Premier Lague 2022) स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएलचा मेगा लिलाव पार पडेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मला आयपीएल बाबतदेखील त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
काय म्हणाले गांगुली?
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गांगुली म्हणाले,
“ही स्पर्धा सध्या कागदावर आकार घेत आहे. बीसीसीआयला ती पुरुषांच्या आयपीएलइतकी मोठी आणि यशस्वी बनवायची आहे. आम्ही पूर्ण महिला आयपीएल बनवण्याच्या टप्प्यावर आहोत. ते नक्कीच होणार आहे. मला ठाम विश्वास आहे की पुढील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये हे पूर्ण जोमाने सुरू करण्यासाठी खूप चांगला काळ असेल. महिला आयपीएल जे पुरुषांच्या आयपीएलइतकेच मोठे आणि भव्य असेल.”
सन २००८ मध्ये भारतात पहिल्यांदा आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आजतागायत महिला आयपीएलचे आयोजन होऊ शकले नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही देशांनी महिला बिग बॅश लीग आणि महिला हंड्रेड यासारख्या फ्रँचायझी-आधारित महिला स्पर्धा सुरू केल्या आहेत. या लीगमध्ये भारतीय महिला खेळाडू खेळतात आणि चांगली कामगिरी करत असल्या तरी भारतात त्याची सुरुवात झालेली नाही.
भारतात महिला आयपीएल सुरू झाली नसली तरी २०१८, २०१९ व २०२० मध्ये वुमेन्स टी२० चॅलेंज (Womens T20 Challenge) ही छोटेखानी स्पर्धा आयपीएलच्या दरम्यान खेळवली जात होती. पहिल्या वर्षी केवळ एक प्रदर्शनीय सामना झाल्यानंतर, पुढील दोन हंगामात काही इतर सामने देखील खेळविण्यात आले. या सामन्यांमध्ये जगभरातील मातब्बर महिला क्रिकेटपटूने सहभाग नोंदविला होता. २०२१ मध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. परंतु, २०२२ मध्ये पुन्हा ही स्पर्धा खेळली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-