पुढच्या वर्षी (2021) जानेवारी ते मार्च महिन्यात इंग्लंड संघ भारत दौरा करेल. यावेळी भारतीय संघ आपला तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना खेळेल. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध भारताचा तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना होणार आहे. कोलकाता येथे पार पडलेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही माहिती दिली आहे.
कसोटी क्रिकेट खेळण्यास येणार नाही अडचण
याबद्दल बोलताना गांगुली म्हणाले, “आमच्याकडे अजून खूप वेळ आहे. आम्ही सध्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. येत्या काही दिवसांत ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी भारतीय संघाची निवड केली जाईल. आयपीएलनंतर कसोटी क्रिकेट खेळण्यास कोणतीही अडचण येणार नाही कारण संघात सर्वच दर्जेदार खेळाडू आहेत.”
अहमदाबाद, धर्मशाला आणि कोलकाता येथे होऊ शकतात कसोटी सामने
“पुढच्या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत इंग्लंडला पाच कसोटी सामने आणि मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारत दौरा करावा लागेल. अहमदाबाद, धर्मशाला आणि कोलकाता येथे कसोटी सामने आयोजित केले जाऊ शकतात. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही” असे पुढे बोलताना गांगुली यांनी सांगितले.
बीसीसीआय भारतात मालिका आयोजित करण्यास आहे वचनबद्ध
भारतातील कोरोनाच्या वाढत्या घटनांनंतर अशी आशंका वर्तवली जात होती की ही मालिका युएईमध्येही आयोजित केली जाऊ शकते. याबद्दल बोलताना गांगुली म्हणाले की, “बीसीसीआय ही मालिका भारतात आयोजित करण्यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी बीसीसीआय सर्व पर्यायांचा विचार करत आहे. बीसीसीआय जैव सुरक्षित वातावरणाचा विचार करत आहे. आम्ही 1 जानेवारीपासून रणजी करंडक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेचा निर्णय आगामी वार्षिक बैठकीत घेण्यात येईल.”
दिवस-रात्र कसोटीचे आयोजन का केले जाते?
कसोटी क्रिकेट रोमांचक करण्यासाठी दिवस-रात्र सामन्यांचे आयोजन केले आहे. आतापर्यंत 14 दिवस-रात्र कसोटी सामने खेळले गेले आहेत. सर्वप्रथम 2015 मध्ये (27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर) दिवस-रात्र कसोटी सामना खेळला गेला होता. ऍडिलेड ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 3 गडी राखून पराभव केला. इंग्लंड विरुद्ध होणारा कसोटी सामना हा भारताचा तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना असेल.
2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध भारताने आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला होता. कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे झालेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशचा डाव आणि 46 धावांनी पराभव केला होता. त्याचबरोबर भारत आगामी ऑस्ट्रेलिया दौर्यावर दुसरा दिवस-रात्र कसोटी सामना खेळेल.
एकही सामना झाला नाही अनिर्णित
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्व 14 दिवस-रात्र कसोटी सामन्यांचे निकाल समोर आले आहेत. एकही कसोटी सामना अनिर्णीत राहिला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
-टीम इंडिया जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर खेळू शकते दिवस-रात्र कसोटी सामना
-या कर्णधारांनी आत्तापर्यंत केले आहेत दिवस-रात्र कसोटीत शतके, विराटचाही झाला समावेश
बाजीगर! आयपीएलमध्ये संघ पराभूत होऊनही सामनावीर पुरस्कार मिळवणारे १४ खेळाडू
ट्रेंडिंग लेख –
ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला
HBD विरू : तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं ! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले