---Advertisement---

धोनीने भविष्याबद्दल कर्णधार आणि निवडकर्त्यांशी चर्चा केली असेल- सौरव गांगुली

On: सोमवार, डिसेंबर 30, 2019 11:40 AM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) पुनरागमनाबद्दल (Comeback) मागील काही महिन्यांपासून बरेच तर्क- वितर्क लावले जात आहेत. यावर आता बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) शनिवारी धोनीबद्दल मोठे भाष्य केले आहे.

गांगुली म्हणाला की, धोनीने आपल्या भविष्यातील योजनांवर भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि निवडकर्त्यांशी (Selectors) नक्कीच चर्चा केली असेल.

भारतीय संघ वनडे विश्वचषकातील उपांत्य फेरीतून बाहेर पडला होता. तेव्हापासून धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती (Rest) घेतली आहे. त्यामुळे आता धोनीच्या भविष्यातील पुनरागमनाबद्दल विविध तर्क लावले जात आहेत.

“धोनीने कर्णधार विराटशी चर्चा केली आहे. मला खात्री आहे की, त्याने निवडकर्त्यांबरोबरही चर्चा केली असेल. या विषयावर चर्चा करण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे, असे मला वाटत नाही,” असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाला.

2011च्या वनडे विश्वचषकातील विजयी संघाचा (भारत) कर्णधार धोनीची प्रशंसा करताना गांगुली म्हणाला की, धोनीसारखा खेळाडू मिळणे खूप कठीण आहे.

“धोनीला काय करायचे आहे हा केवळ त्याचा निर्णय असेल. मी त्याच्याशी चर्चा केली नाही. परंतु तो भारतीय क्रिकेटचा चँपियन आहे,” असेही गांगुली यावेळी म्हणाला.

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना धोनी म्हणाला की, जानेवारी 2020 च्या नंतरच हा प्रश्न विचारा.

धोनीने डिसेंबर 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

धोनीने आतापर्यंत 90 कसोटी सामने, 350 वनडे सामने आणि 98 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने कसोटीत 4876, वनडेत 10773 आणि टी20त 1617 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/Maha_Sports/status/1211254704644055041

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---