---Advertisement---

मी अंबाती रायडूऐवजी रहाणेला वनडे संघात घेतल असतं- गांगुली

On: बुधवार, मे 9, 2018 2:08 PM
---Advertisement---

मुंबई । मंगळवारी भारतीय संघाची इंग्लंडमध्ये होणाऱ्या वनडे मालिकेसाठी निवड झाली. यातुन मुंबईकर अजिंक्य रहाणेचे नाव आश्चर्यकारकरित्या वगळण्यात आले. यामुळे भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.

१६ खेळाडूंचा हा संघ इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यात अजिंक्य रहाणेच्या जागी अंबाती रायडूची निवड करण्यात आली. सध्या रायडू आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

“अजिंक्यला संघात स्थान मिळायला हवे होते.त्याला वगळणे हा अतिशय कठोर निर्णय आहे. मी अंबाती रायडूच्या आधी रहाणेच्या नावाचा विचार केला असता. ज्या इंग्लंड देशात चेंडू चांगलाच वळतो तिथे रहाणे हा उच्च दर्जाचा खेळाडू आहे. तसेच त्याने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरीही केली आहे” असे गांगुली म्हणाला.

Read- नाबाद ९५ धावा करुनही केएल राहुलच्या नावावर झाला नकोसा असा विक्रम

“श्रेयस अय्यरची वनडे संघात निवड करणे हा चांगला निर्णय आहे. करुण नायरला कसोटी संघात घेणे हा थोडा आश्चर्यकारक निर्णय वाटतो. तरीही श्रेयसला अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी संघातही स्थान द्यायला हवे होते.” असेही हा खेळाडू पुढे म्हणाला.

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ ३ टी२० सामने, ३ वनडे सामने आणि ५ कसोटी सामने खेळणार आहेत. यातील वनडे आणि टी२० साठी आज संघ निवड झाली.

Read-एकाच वेळी विराट दोन सामने कसे खेळणार?

१२ जुलै ते १७ जुलै २०१८ या काळात ही वनडे मालिका होणार आहे.

अशी आहे टीम इंडिया- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, अंबाती रायडू, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, वाॅशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव

Read-भारतीय कसोटी संघात निवड झालेल्या खेळाडूच्या आई-वडीलांचा अपघात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment