भारतीय क्रिकेट बदलाच्या काळातून जात आहे. राहुल द्रविडच्या रूपाने संघाला नवा मुख्य प्रशिक्षक (Headcoach Rahul Dravid) मिळाला आहे. त्याचबरोबर आता मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाची कमान पूर्णपणे रोहित शर्माच्या हाती आली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटचे भवितव्य काय असेल? या विषयावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) यांनी एका क्रिकेट संकेतस्थळाला मुलाखत दिली. यामध्ये गांगुली यांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, आमच्याकडे खूप चांगला प्रशिक्षक आणि सक्षम कर्णधार आहे. गेल्या ५ वर्षात या संघाने यशाच्या नवनव्या गाथा रचल्या आहेत. अशा स्थितीत हा संघ भविष्यात मोठी उंची गाठू शकणार नाही, याचे कोणतेही कारण मला दिसत नाही.
याच मुलाखतीत गांगुली यांनी हेही उघड केले की, प्रशिक्षक म्हणून द्रविड का खास आहे? यासाठी त्याने कानपूर कसोटीशी संबंधित एक मजेशीर गोष्ट सांगितली. गांगुली म्हणाले, “मी ऐकले होते की कानपूर कसोटीपूर्वी संघाच्या सराव सत्रानंतर, द्रविड सरावासाठी वापरले जाणारे चेंडू आणि इतर सर्व गोष्टी आणि ड्रेसिंग रूममध्ये परत आणत होता. राहुल द्रविडला हे करताना पाहून कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सना नक्कीच आनंद झाला असेल. परंतु, मी त्याला बर्याच काळापासून ओळखतो. तो नेहमीच अशा प्रकारची व्यक्ती आहे. खेळाशी संबंधित प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींची तो काळजी घेतो.”
यापूर्वी, गांगुली यांनी द्रविडला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्याची संपूर्ण कहाणी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती. गांगुली या मुलाखतीत म्हणाले होते की, “आयपीएलदरम्यानच भारतीय प्रशिक्षकाला १ महिना घरी घालवण्याची संधी मिळते. दीर्घकाळ घरापासून दूर राहण्याचा विचार करून ही जबाबदारी पेलण्यास द्रविड तयार होत नव्हता. कारण, भारतीय संघासोबत त्याला ८ ते ९ महिने घराबाहेर राहावे लागेल.” गांगुली यांनी द्रविड याला कशाप्रकारे भारतीय संघाचा प्रशिक्षक बनविण्यात आले, याविषयीची देखील कहानी सांगितली. तसेच, रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यानंतर द्रविड व्यतिरिक्त आणखी कोणता पात्र व्यक्ती नव्हता अशी देखील स्पष्टोक्ती दिली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘महाराष्ट्राची नंबर १ डीश’ म्हणत सचिन तेंडुलकरने मिसळ पाववर मारला ताव, व्हिडिओ व्हायरल
‘त्या’ दौऱ्यानंतर पूर्णपणे खचून गेला होता विराट, रवी शास्त्रींचा उलगडा