---Advertisement---

अंतिम सामन्यापूर्वी सौरव गांगुली टीम इंडियासाठी काय म्हणाले? जाणून घ्या

On: शनिवार, मार्च 8, 2025 4:38 PM
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा कोण जिंकेल? या प्रश्नाचे उत्तर रविवारी 9 मार्च रोजी मिळणारच आहे. जेव्हा भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना खेळला जाईल. याआधी क्रिकेट दिग्गजांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू भारतीय संघाला सामन्यासाठी शुभेच्छा देत आहेत. यादरम्यानच भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये विजय मिळवून दिलेले सौरव गांगुली यांनाही विचारण्यात आले की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धा जिंकेल का?

भारतीय संघाने त्यांचा पहिला चॅम्पियन्स ट्रॉफी किताब 2002 मध्ये जिंकला होता. त्यादरम्यान त्यांना श्रीलंका सोबत संयुक्त स्वरूपात चॅम्पियन्स घोषित करण्यात आले होते. तेव्हा टीम इंडियाचे कर्णधार सौरव गांगुली होते. कोलकत्ता मध्ये उपस्थित असताना गांगुली यांना जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर विचारण्यात आले तेव्हा त्यांनी टीम इंडियाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.

एनएनआय सोबत बोलताना सौरव गांगुली म्हणाले, भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हा खूप चांगला संघ आहे आणि आम्हाला आशा आहे की अंतिम सामन्यात सुद्धा सर्व खेळाडू चांगलं प्रदर्शन करतील.

रिपोर्टरने त्यांना विचारले की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अंतिम सामना जिंकणार का? तेव्हा गांगुली म्हणाले हो हो नक्कीच. का नाही जिंकणार? जर चांगले खेळले तर नक्कीच जिंकतील.

2002 नंतर भारतीय संघाने त्यांचा दुसरा आणि शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफी किताब 2013 मध्ये एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. भारतीय संघ सलग तिसऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यात पोहोचली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने चांगलं प्रदर्शन केल आहे. तसेच संघाने साखळी सामन्यात न्यूझीलंडला दुबईच्या स्टेडियमवर पराभूत केलं होतं. आता अंतिम सामन्यासाठी सर्वांचे लक्ष या सामन्याकडे लागलं आहे.

हेही वाचा

भारत-न्यूझीलंड सामन्याबद्दल माजी प्रशिक्षकाने केले मोठे वक्तव्य! ते नक्की काय हे जाणून घ्या

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहितचं कर्णधारपद धोक्यात? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय!

केवळ नावाचा ‘हिटमॅन’? आयसीसी फायनलमधील आकडेवारी पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---