IPL 2024 Auction: इंडियन प्रीमिअर लीग 2024 हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत पार पडला. या लिलावात अनेक खेळाडू मालामाल झाले. त्यांना बेस प्राईजच्या दुप्पट-तिप्पट रक्कम मिळाली. मालामाल झालेल्या खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएट्जी याच्या नावाचाही समावेश आहे. गेराल्ड कोएट्जी मुंबई इंडियन्स संघाच्या ताफ्यात सामील झाला. त्याला मुंबईने बेस प्राईजच्या दुप्पटीपेक्षा जास्त रक्कम दिली.
गेराल्ड कोएट्जी 5 कोटींचा मालक
गेराल्ड कोएट्जी (Gerald Coetzee) याने आयपीएल 2024 (IPL 2024) लिलावात आपली बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवली होती. यावेळी त्याच्यावर 5 वेळची आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने विश्वास दाखवला. मुंबईने त्याच्यावर तब्बल 5 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या पलटणचा भाग बनवले. आता गेराल्ड कोएट्जी आयपीएल 2024 हंगामात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाकडून फलंदाजांना घाम फोडताना दिसेल.
विश्वचषकात केलेला कहर
खरं तर, 23 वर्षीय गेराल्ड कोएट्जी हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने मागील महिन्यात पार पडलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भलताच चमकला होता. तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी होता. शानदार लाईन आणि लेंथ असणाऱ्या या गोलंदाजाने 8 सामन्यात 19.80च्या सरासरीने 20 विकेट्स नावावर केल्या होत्या. अशात गेराल्ड कोएट्जी पहिल्यांदा आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसेल. गेराल्डला आयपीएलमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक भलतेच उत्सुक असतील. (south africa fast bowler gerald coetzee is sold to mumbai indians for inr 5 crore ipl 2024 auction)
हेही वाचा-
धक्कादायक! ज्याने ट्रॉफी जिंकून दिली, त्यालाच केले हैदराबादने ब्लॉक; वॉर्नरने स्टोरी टाकत केला खुलासा
आयपीएल 2015 नंतर खेळणारे ठरले नशीबवान! पाहा प्रत्येक हंगामातील महागडा खेळाडू






