---Advertisement---

वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाचे झाले भारतात आगमन

On: सोमवार, मार्च 9, 2020 5:05 PM
---Advertisement---

12 मार्चपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ आज(9 मार्च) दिल्ली येथे पोहचला आहे. तसेच हा 16 जणांचा दक्षिण आफ्रिका संघ आजच दिल्ली येथून धरमशाला येथे रवाना होणार आहे.

या मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे होणार आहे. भारतीय संघ उद्या धरमशालाला पोहचेल. तसेच त्याआधी भारतीय खेळाडू बंगळुरुमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस टेस्ट देतील.

त्याचबरोबर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता दक्षिण आफ्रिका संघासह त्यांचे प्रमुख वैद्यकिय अधिकारी डॉक्टर शोएब मांजरापण भारत दौऱ्यावर आले आहेत.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात होणाऱ्या वनडे मालिकेसाठी दोन्ही देशांचे संघ जाहीर झाले आहेत. या मालिकेसाठी जाहीर केलेल्या भारतीय संघात भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या आणि शिखर धवन यांचे दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन झाले आहे. तसेच या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसचेही पुनरागमन झाले आहे.

या मालिकेतील धरमलाशा येथे पहिला सामना झाल्यानंतर 15 मार्चला लखनऊ येथे दुसरा वनडे सामना होईल. तर तिसरा वनडे सामना 18 मार्चला कोलकाता येथे होणार आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेसाठी असे आहेत संघ – 

भारत – विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिखर धवन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, केएल राहुल, रिषभ पंंत, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव.

दक्षिण आफ्रिका – क्विंटॉन डी कॉक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), तेंबा बाऊमा, रस्सी व्हॅन दर दसेन, फाफ डू प्लेसिस, काईल वेरिन, हेन्रीच क्लासेन, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, अँडील फेहलुक्वायो, लुंगी एन्गिडी, लुथो सिपाम्ला, ब्यूरान हेन्ड्रिक्स, एन्रीच नोर्जे, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, जानेमन मलान.

#दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा – 2020

12 मार्च – पहिला वनडे – धरमशाला

15 मार्च – दुसरा वनडे – लखनऊ

18 मार्च – तिसरा वनडे – कोलकता

महत्त्वाच्या बातम्या – 

…तरच धोनीचे होऊ शकते टीम इंडियात पुनरागमन

उपविजेत्या भारतीय महिला संघाबद्दल सर व्हिव्हिअन रिचर्ड्स म्हणाले…

विश्वचषकाच्या फायनलनंतर ऑस्ट्रेलिया, भारत संघाला मिळाले एवढे करोड रुपये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---