दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंडविरुद्धच्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी त्यांचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. डू प्लेसिससह कागिसो रबाडा, पीट वॅन बिलजोन, बोर्जोन फॉर्ट्यूइन आणि रीजा हेंड्रिंक्स हे खेळाडूदेखील इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नाहीत.
वेगवान गोलंदाज रबाडा यापूर्वीच दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर पडला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने उर्वरित चार खेळाडूंना वनडे मालिकेसाठी आराम देत असल्याचे जाहीर केले. हे खेळाडू क्रिकेट मंडळाच्या चारदिवसीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, अथवा विश्रांती देखील घेऊ शकतात, असे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.
टी-२० मालिकेत पत्करला पराभव
इंग्लंड संघाविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला तीनही सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. तीनही सामन्यांत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला अनुक्रमे ५, ४ आणि ९ गडी राखून पराभूत केले. या मालिकेत डू प्लेसिस टी-२० संघाचा भाग होता. या मालिकेतील ३ सामन्यांत त्याने ६०.५० च्या सरासरीने १२१ धावा काढल्या.
३ सामन्यांची वनडे मालिका
दक्षिण आफ्रिका दौर्यावर असलेला इंग्लंड संघ टी-२० मालिकेनंतर ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. ४ डिसेंबरपासून सुरू होणार्या या मालिकेतील पहिला सामना केपटाऊन येथे खेळविला जाईल, तर दुसरा सामना ६ डिसेंबरला पर्ल आणि तिसरा सामना ९ डिसेंबर रोजी केपटाऊन येथे खेळविला जाईल.
वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ
क्विंटन डी कॉक (कर्णधार/यष्टीरक्षक), टेंबा बावुमा, ज्युनियर डाला, ब्युरन हेंड्रिक्स, हेन्रीक क्लासेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, जानेमन मलान, डेविड मिलर, लुंगी एंगिडी, एन्रीच नॉर्किए, अँडिले फेहलुक्वायो, तबरेज शम्सी, लुथा सिपाम्ला, जोन-जोन स्म्ट्स, ग्लेंटन स्टुरमैन, रस्सी व्हॅन डर दसेन, काईल वेरिन
महत्त्वाच्या बातम्या-
‘स्विच हिटवर बंदी आणा’, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराची आयसीसीकडे संतप्त मागणी
१५ वर्षांच्या टी२० क्रिकेट इतिहासात कोणालाही न करता आलेला पराक्रम डेविड मलानने केलाय
…म्हणून मिशेल स्टार्क भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळला नाही, फिंचने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे ५ संघ; टीम इंडिया आहे ‘या’ स्थानावर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव