---Advertisement---

जडेजाने पार पाडली फिनिशरची भूमिका, विराटच्या शतकामुळे भारताची 326 धावांपर्यंत मजल

On: रविवार, नोव्हेंबर 5, 2023 6:04 PM
Ravindra Jadeja Virat Kohli
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात रविवारी (5 नोव्हेंबर) विराट कोहली याने अप्रतिम खेळ दाखवत शतक ठोकले. आवला 35 वा वाढदिवस साजरा करत असणाऱ्या विराटसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा सामना खास ठरला. त्याचसोबत श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा यानी केलेल्या धावांमुळे भारतीय संघ ईडन गार्डन्सवर 326 धावांपर्यंत मजल मारू शकला. यादरम्यान एकूण 5 फलंदाजांनी विकेट्स घमावल्या.

भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्मय फलंदाजांनी योग्य ठरवला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल नेहमीप्रमाणे डावाची सुरुवात करण्यासाठी आले. मात्र, रोहित वैयक्तिक 40 आणि गिल वैयक्तिक 23 धावा करून बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावर आलेला विराट कोहली (Virat Kohli) आणि चौथ्या क्रमांकावर केळणारा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्यात मात्र मोठी भागीदारी पाहायला मिळाली. श्रेयस अय्यर याने 87 चेंडूत 77 धावा करून विकेट गमावली. पण विराटने पुढे 119 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. विराटने या सामन्यात 121 चेंडूंमध्ये 101* धावांचे योगदान दिले.

यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांना संघासाठी मोठी खेळी करता आली नाही. राहुलने 17 चेंडूत 8 धावा केल्या, तर सूर्यकुमार यादव 14 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. रविंद्र जडेजा याने शेवटपर्यंत विराटची साथ देत 29* धावा कुटल्या. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघासाठी लुंगी एन्गिडी, मार्को यान्सेन, कागिसो रबाडा, केशव माहाराज आणि तबरेज शम्सी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. यान्सेन दक्षिण आफ्रिकी संघाला चांगलाच महागात पडला, ज्याने 9.4 षटकात सर्वाधिक 94 धावा खर्च केल्या.

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी

महत्वाच्या बातम्या –
प्लेईंग 11 मध्ये नसतानाही ईशान किशनचीच चर्चा! कोणी म्हणतंय कबूतर, तर कोणी म्हणले हिरा ठाकूर
तो आला आणि विक्रम मोडून गेला! श्रेयसने 77 धावांची खेळी करताच सचिनचा ‘तो’ Record उद्ध्वस्त

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---