गुरुवारी (दि. ०९ जून) दिल्ली येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पहिला टी२० सामना पार पडला. ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला. दक्षिण आफ्रिका संघाने हा सामना ७ विकेट्सने खिशात घातला. तसेच, मालिकेत १-०ने आघाडी घेतली. आफ्रिकेच्या या विजयाचे शिल्पकार डेविड मिलर आणि रस्सी व्हॅन डर दुसेन ठरले. दोघांनीही अर्धशतक झळकावत संघाला पहिल्या विजयाचं पाणी पाजण्यात मोलाचा वाटा उचलला. या पराभवामुळे भारतीय संघाचे सलग १३ टी२० सामने जिंकण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. यापूर्वी खेळलेले सलग १२ टी२० सामने भारताने जिंकले होते.
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत २११ धावा चोपल्या होत्या. भारताचे हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने १९.१ षटकात पूर्ण केले. त्यामुळे त्यांना हा सामना ७ विकेट्सने जिंकण्यात यश आले.
🚨 RESULT | #Proteas WIN BY 7 WICKETS
An incredible unbeaten 131-run partnership between David Miller (64*) and Rassie van der Dussen (75*) saw the #Proteas break the record books in Delhi to go 1-0 up in the 5-match T20I series#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/iYnibtADS1
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 9, 2022
दक्षिण आफ्रिका संघाकडून फलंदाजी करताना डेविड मिलर आणि रस्सी व्हॅन डर दुसेन यांनी अर्धशतक झळकावले. रस्सीने ४६ चेंडूत ७५ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ५ षटकार आणि ७ चौकारही मारले. मिलरने ३१ चेंडूत ६४ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ४चौकार आणि ५ षटकारांचा पाऊस पाडला. तसेच, या दोघांनी नाबाद १३१ धावांची शतकी भागीदारीही पूर्ण केली. त्यांच्याव्यतिरिक्त ड्वेन प्रिटोरियस याने २९, यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक याने २२ आणि कर्णधार तेंबा बावुमा याने १० धावांचे योगदान दिले.
यावेळी भारतीय संघाचे गोलंदाज विकेट घेण्यासाठी संघर्ष करताना दिसले. फक्त ३ गोलंदाजांनाच विकेट घेण्यात यश आले. त्यात भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून खेळताना इशान किशन (Ishan Kishan) याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने ४८ चेंडूत ७६ धावा केल्या. या धावा करताना त्याने ३ षटकार आणि ११ चौकारांची बरसात केली. त्याच्याव्यतिरिक्त श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने ३६, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने नाबाद ३१, कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) याने २९ आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने २३ धावांचे योगदान दिले.
दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना केशव महाराज, एन्रीच नॉर्किया, वेन पार्नेल आणि ड्वेन प्रिटोरियस यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दात तुटून रक्तबंबाळ झालेलं फलंदाजाचं तोंड, पाहा एँडरसनने फेकलेल्या घातक चेंडूचा व्हिडिओ
दीडशेहून अधिक वेगाने बॉलिंग करणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजावरील बॅन हटला, ‘या’ कारणामुळे आणली होती बंदी
‘मी ही जागा कुठेतरी पाहिलीये’, दिनेश कार्तिकच्या पुनरागमनावर माजी दिग्गजाची प्रतिक्रिया व्हायरल