---Advertisement---

रमजानच्या पवित्र महिन्यात ‘या’ अष्टपैलूने पत्नीसोबत स्विकारला इस्लाम धर्म, भारताशी आहे खास नाते

On: रविवार, एप्रिल 25, 2021 1:01 PM
---Advertisement---

आपल्याला माहितीच आहे की, जीवन जगताना प्रत्येक मनुष्याला आपल्या आवडीचा धर्म स्विकारण्याचे स्वातंत्र्य असून जो तो आपल्या मनाने आपला धर्म निवडू शकतो. त्यामध्ये सध्या दक्षिण आफ्रिकेचा 26 वर्षीय क्रिकेटपटू बोर्न फोर्टुईन याने इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचे सांगितले जात आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, रमजानच्या पवित्र महिन्यात त्याने आपल्या पत्नीसमवेत इस्लाम धर्माचा स्वीकार केला असून आता त्याने आपले नाव बदलून इमाद असे ठेवले आहे. फोर्टुईनचा सहकारी खेळाडू तबरेज शम्सीची पत्नी खदीजा शम्सी यांनी फोर्टुईन आणि त्याची पत्नी मिचेक एसेन यांचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

फॉर्चुईन हा इस्लाम धर्म स्विकारणारा दुसरा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू असून त्याअगोदर 2011 मध्ये मध्यमगतीचा वेगवान गोलंदाज वायने पार्नेलनेही आपला धर्म बदलला होता.

Photo Courtesy: Instagram/@bjornfortuin

या अष्टपैलू खेळाडूच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल सांगायचे झाले, त्याने 2013 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्दीची सुरूवात केली होती परंतु त्याची पदार्पण सामन्यातील कामगिरी खूपच खराब राहिली होती. या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. तर गोलंदाजीमध्येही त्याला एकसुद्धा बळी मिळवता आला नव्हता. त्याने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 47 सामने खेळले असून यामध्ये त्याने 1652 धावा केल्या आहेत आणि 122 बळी घेतले आहेत. तर अ गटातील 60 सामने खेळले असून यामध्ये 630 धावा केल्या आहेत. तर 70 बळी घेतले आहेत.

त्यानंतर 2019 मध्ये भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 संघात त्याचा समावेश होता. त्यानंतर 7 फेब्रुवारी 2020 रोजी त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आत्तापंर्यत दक्षिण आफ्रिकेच्या संघातून 7 टी-20 सामने खेळले असून यामध्ये त्याने 6 बळी घेतले आहेत आणि 35 धावा केल्या आहेत. या महिन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या टी-20 सामन्यातही त्याला दक्षिण आफ्रिका संघात स्थान देण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

विरूला सलामीच्या जागी खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले असते का? रोहितच्या ‘त्या’ निर्णयावर भडकला जडेजा

रिषभ पंतचं हृदय चोरणारी सौंदर्यवती आहे तरी कोण? जिच्या एका फोटोचेही आहेत लाखो दिवाने

रोहित-मॉर्गनला १२ लाखांचा दंड झाल्याने इंग्लिश दिग्गज भलताच खुश; म्हणे, ‘खेल से खिलवाड नहीं’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---