---Advertisement---

स्लिप मधील क्षेत्ररक्षकाने हवेत सूर मारत घेतला अविश्वसनीय झेल, एकदा व्हिडिओ पाहाच

On: मंगळवार, मार्च 2, 2021 7:47 PM
---Advertisement---

संघातील सर्वात चपळ आणि अनुभवी खेळाडूला स्लीप मध्ये क्षेत्ररक्षण करण्याची जबाबदारी दिली जाते. स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करणे सोपे नसते. स्लीप मधील खेळाडू फलंदाज आणि यष्टिरक्षक यांच्या अगदी जवळ असतो. त्यामुळे त्याला झेल टिपण्यासाठी खूप वेळ मिळतो. गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर तो बॅटचा कडा घेत जलद गतीने येतो.

त्यामुळे चेंडू कुठल्या बाजूला जाईल याचा अंदाज घेण्यासाठी क्षेत्ररक्षकाकडे खूप कमी सेकंदाचा अवधी असतो. अशातच दक्षिण आफ्रिकेतील एका सामन्यात एका खेळाडूने स्लीप मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आश्चर्यकारक झेल टिपला आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या ५० षटकांच्या घरगुती क्रिकेट सामन्यात एका खेळाडूने आश्चर्यकारक झेल टिपून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याचे झाले असे की, फिरकी गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आला. त्यावेळी हा क्षेत्ररक्षक पहिल्या स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. चेंडू टाकल्यानंतर फलंदाजाने पैडल स्वीप शॉट खेळला. आणि या क्षेत्ररक्षकाने पहिल्या स्लीप मधून धावत जाऊन डाइव मारत लेग स्लीप मध्ये झेल टिपला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या खेळाडूने पूर्वानुमान लावत, पहिल्या स्लीप मधून लेग स्लीपच्या दिशेने डाइव मारत हा झेल टिपला आहे.

दक्षिण आफ्रिकन संघातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निर्माण होत असतात.  यापूर्वी देखील २००९ रोजी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या घरगुती सामन्यात मार्टिन वैन जारवेल्ड याने पहिल्या स्लीप मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना लेग स्लीप मध्ये जाऊन झेल टिपला होता. त्याने ही पूर्वनुमान लावला होता की, फलंदाज स्वीप शॉट खेळणार आहे. यामुळे त्याने पहिल्या स्लीप मधून लेग स्लीप च्या दिशेने धाव घेत हा झेल टिपला होता.

दक्षिण आफ्रिकन संघ हा क्षेत्ररक्षणाचा बाबतीत अव्वल स्थानी आहे. याच संघातून जागतिक क्रिकेटला जोंटी रोड्स, ए बी डीवीलीयर्स, फाफ डू प्लेसिस आणि जे पी डूमिनी यांसारखे अव्वल दर्जाचे क्षेत्ररक्षक मिळाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

आयसीसी वनडे क्रमवारी : स्मृती मंधानाची घसरण, तर झुलन गोस्वामी-मिताली राज अव्वल दहामध्ये कायम

बजरंग पुनिया घेतोय सोशल मीडियापासून ब्रेक, हे आहे कारण

चौथ्या कसोटी सामन्यात रोहित-शुबमनलाच मिळणार का सलामीला संधी? हे आहेत भारतीय संघासमोरील पर्याय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---