इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यासाठी आली होती. परंतु येत्या १९ सप्टेंबरपासुन युएईमध्ये या स्पर्धेतील उर्वरित सामने खेळले जाणार आहेत. दरम्यान बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचाइजींच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे. बांगलादेश आणि इंग्लंडनंतर आता आणखी एका देशातील खेळाडू आयपीएलच्या पहिल्या आठवडयासाठी उपलब्ध नसणार आहेत.
येत्या १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रीमियर लीगच्या उर्वरित हंगामाला सुरुवात होणार आहे. हा हंगाम सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार होणार आहे. हा दौरा २ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळले जाणार आहे. तसेच हा दौरा आयपीएल स्पर्धा सुरू होण्याच्या ५ दिवसा आधी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी समाप्त होणार आहे.
क्रिकबजच्या वृत्तानुसार, कोविड १९ च्या परिस्थितीत रेड झोनमध्ये असलेल्या देशांना युएई सरकार बबल-टू-बबल येण्याची परवानगी देणार नाही. याचा अर्थ हा की ते १५ सप्टेंबरला यूएईमध्ये हजर राहतील. परंतु लुंगी एन्गिडी, कगिसो रबाडा आणि डेविड मिलर यांना आयपीएलच्या बायो बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ७-१० दिवस विलगिकरणात रहावे लागेल. याच कारणास्तव त्यांना आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात सहभाग घेता येणार नाही. (South African player’s will not present in the first week of the ipl)
नुकताच भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. तर प्रत्युत्तरात टी-२० मालिकेत श्रीलंका संघाने भारतीय संघाला २-१ ने पराभूत केले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत श्रीलंका संघ नव्या उत्साहासह मैदानात उतरेल. तसेच दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू देखील चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयच्या सीईओ पदासाठी शोधमोहीम सुरू, आयपीएल मुख्य कार्यकारी अमीनही करू शकतात अर्ज
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे असे आहे वेळापत्रक; पूर्ण संघ, ठिकाण अन् वेळ जाणून घ्या सर्वकाही
नॉटिंघमच्या खेळपट्टीचा फोटो आला पुढे; फलंदाज की गोलंदाज, पाहा कोणासाठी मदतशीर ठरेल हे मैदान?