दक्षिण अफ्रिकेचा फिरकी गोलदाज इम्रान ताहिर (imran tahir) याने आयसीसी टी२० विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2022) मुल्तान सुल्तान्स (multan sultans) संघासाठी खेळत आहे. त्याने स्वतःच्या फिटनेसवर विश्वास व्यक्त करत आगामी टी२० विश्वचषकात खेळण्यासाठी फिट असल्याचे सांगितले आहे. मागच्या वर्षी टी२० विश्वचषकात त्याला दक्षिण अफ्रिकेचे प्रतिनिधित्व करता आले नव्हते.
टी२० विश्वचषक २०२१ मध्ये दक्षिण अफ्रिकेच्या निवडकर्त्यांनी इम्रान ताहीरला निवडले नव्हते. निवडकर्त्यांच्या या निर्णयानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. आता पुढच्या टी२० विश्वचषकात खेळण्याविषयी इम्रान म्हणला की, “मी आताही टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये निवडीसाठी उपलब्ध आहे. मला वाटते की, मी टी२० विश्वचषक खेळण्यासाठी उपलब्ध आहे. मला आशा आहे की, निवडकर्ते माझ्या प्रदर्शनावर विचार करतील. जर त्यांनी तसे केले, तर मला विश्वास आहे की, ते मला एक योग्य दावेदार मानतील.”
इम्रान ताहीर दक्षिण अफ्रिकेसाठी खेळत असला, तर त्याचा जन्म पाकिस्तानचा आहे. या संदर्भात बोलताना तो म्हणाला की, “हा एक अनोखा अनुभव आहे की, मी पाकिस्तानसाठी एक विदेशी खेळाडू आहे. ज्याठिकाणी मी जन्मलो होतो आणि एवढेच नाही तर सुरुवातीचे क्रिकेटही खेळले आहे. परंतु, मी दक्षिण अफ्रिकेचाही आभारी आहे की, त्यांनी मला माझ्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी दिली.”
दरम्यान, इम्रान जगभरातील टी२० लीगमध्ये सहभाग घेत आला आहे. सध्या तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतोय. आयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळताना अप्रतिम प्रदर्शन केले आहे. एवढेच नाही, तर नुकत्याच पार पडलेल्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्येही त्याने चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले. असे असले तरी, २०१९ पाहून त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये. अशात टी२० विश्वचषकासाठी त्याला संधी मिळणेही अवघड दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन ओपन नावे करत नदाल बनला टेनिसविश्वाचा राजा! जिंकले विश्वविक्रमी २१ वे ग्रँडस्लॅम
जयपुरची पटनाला पटखनी! नोंदवला ५१-३० असा दणदणीत विजय
इयान चॅपलकडून विराट कोहलीचे कौतुक, म्हणाले – तो सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक होता
व्हिडिओ पाहा –