सध्या दक्षिण आफ्रिका संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना कोलंबोच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान श्रीलंका संघाची फलंदाजी सुरू असताना, असा काही प्रकार घडला जो पंचांच्या ही निदर्शनात आला नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनेक मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. परंतु, तंत्रज्ञान असताना देखील मैदानावर अशा काही घटना घडतात जे पंच आणि तिसऱ्या पंचांच्या निदर्शनात येत नाही. असाच काहीसा प्रकार श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात पाहायला मिळाले आहेत. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाला एका षटकात ६ ऐवजी ७ चेंडू टाकावे लागले.
तर झाले असे की, १६ वे षटक सुरू असताना, एडेन मार्करम गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकात त्याने ६ वैध चेंडू टाकले होते. तरीदेखील तो ७ वा चेंडू टाकण्यासाठी रनअप घ्यायला गेला होता. तेव्हा पंचांना जाणवले की, मार्करमचे षटक पूर्ण झाले आहे. पंचांनी या गोष्टीची पुष्टी करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत मागितली होती.
परंतु, तिसऱ्या पंचांनी देखील सांगितले की,या षटकातील आणखी चेंडू शिल्लक आहे. हा निर्णय पाहून समालोचक देखील आश्चर्यचकित झाले होते. अखेर मार्करमला षटकातील सातवा चेंडू टाकावा लागला. मुख्य बाब म्हणजे त्याने या षटकात एकही नो चेंडू, वाईड चेंडू टाकला नव्हता. तरीदेखील त्याला एकाच षटकात ७ चेंडू टाकावे लागले होते.(South Africas spinner Aiden markram bowls 7 balls in an over despite no extras)
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंका संघाकडून अविष्का फर्नांडोने शतकी खेळी करत ११८ धावा केल्या होत्या. तर चरिथ असलंकाने ७२ धावांचे योगदान दिले होते. श्रीलंका संघाला ५० षटक अखेर ९ बाद ३०० धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना, एडेन मार्करमने ९६ धावांची खेळी केली तर, रस्सी वॅन दर डूसेनने ५९ धावांची खेळी केली होती. परंतु दक्षिण आफ्रिका संघाला अवघ्या ६ बाद २८६ धावा करण्यात यश आले होते. हा सामना श्रीलंका संघाने १४ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
जडेजाला फलंदाजीत बढती देण्यामागे ‘अशी’ होती कर्णधार कोहलीची रणनिती, पण शेवटी झाली निराशा
‘लेडिज इन ओव्हल’; भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन पाहण्यासाठी पत्नी अन् प्रेयसींचा स्टेडियममध्ये जमावडा