स्पेनने फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे स्पेन पुन्हा एकदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय पुरुष क्रिकेटला संघाचीही लॉटरी लागली आहे. ते कसे? हे जाणून घेऊ.
या प्रश्नाचे उत्तर इतिहासात दडलेले आहे, जो भारतीय संघाला एकूण तिसऱ्यांदा वनडे सामन्यामध्ये विश्वविजेता बनण्याकडे निर्देश करतो. स्पेन फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे, असे दुसऱ्यांदा घडू शकते.
स्पेनने जेव्हा 2010 मध्ये फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला, तेव्हा भारतीय संघाने आपली प्रदीर्घ 28 वर्षांची प्रतीक्षा संपवली होती. कारण त्यानंतर म्हणजे 2011 मध्ये भारताने वनडे विश्वचषक जिंकला. आता स्पेन पुन्हा एकदा अंतिम फेरीत दाखल झाला आहे आणि पुढच्याच वर्षी वनडे विश्वचषक आहे. त्यामुळे भारतीच्या पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याच्या आशा जाग्या झाल्या आहेत.
स्पेन 2010 मध्ये विश्वविजेता बनला होता. आता पुन्हा एकदा ते विश्वविजेते बनतील, तर पुढच्या वर्षी टीम इंडियाने वनडे विश्वचषकात मिळवलेला विजय या समीकरणात आणखी एक सकारात्मक पैलू जोडू शकतो.
स्पेनचा अंतिम सामना कोणाशी?
स्पेनची या स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. त्यांनी खेळलेल्या सात पैकी सहा सामन्यांमध्ये क्लीन शीट राखली आहे. त्यांनी आपल्या मोहिमेची सुरूवात केप वर्देविरुद्धच्या गोलशून्य बरोबरीने केली. त्यानंतर त्यांनी सौदी अरेबियाविरुद्ध 4-0, उरुग्वेविरुद्ध 1-0, ऑस्ट्रियाविरुद्ध 3-0, पोर्तुगलविरुद्ध 1-0 आणि बेल्जियमविरुद्ध 2-1 अशी विजयी कामगिरी केली आहे.
त्यानंतर स्पेनने उपांत्य फेरीत 2018 चा विजेता आणि 2022 चा उपविजेता फ्रान्सला 2-0 असे पराभूत करत फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
अंतिम फेरीत स्पेनचा सामना इंग्लंड किंवा गतविजेते अर्जेटिनाशी होईल. इंग्लंड आणि अर्जेंटिना गुरूवारी (16 जुलै) यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला जाणार आहे. (Sapin Football entry in FIFA World Cup Final and Team India ODI World Cup connection)





