---Advertisement---

बांग्लादेशविरुद्ध विंडीजला अशक्यप्राय विजय मिळवून देणारा कायले मेयर्स आहे तरी कोण? वाचा संपूर्ण माहिती

On: सोमवार, फेब्रुवारी 8, 2021 12:49 AM
---Advertisement---

चटगाव मध्ये वेस्ट इंडिज संघाने बांगलादेश संघाला पहिल्या कसोटी सामन्यात मात दिली आहे. बांगलादेश संघाने विंडीज संघासमोर ३९५ धावांचे आव्हान ठेवले होते. इतक्या मोठ्या धावांचे पाठलाग करत असताना वेस्ट इंडिज संघाचा पराजय निश्चित वाटत होता.

परंतु, विडींज संघाचा अष्टपैलू खेळाडू कायले मेयर्स याने दुहेरी शतक झळकावत विंडीज संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मेयर्स याने चौथ्या डावात फलंदाजी करताना ३१० चेंडूत २१० धावा काढल्या. ज्यात २० चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.

पदार्पणच्या सामन्यात खास विक्रमाला गवसणी 

कायले मेयर्सची ही खेळी अतिशय खास आहे. कारण पदार्पणच्या सामन्यात दुसऱ्या डावात दुहेरी शतक झळकावणारा कायले मेयर्स हा जगातील एकमेव क्रिकेटपटू बनला आहे. याबरोबरच कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात आशियामध्ये दुहेरी शतक करणारा फलंदाज बनला आहे. याआधी गॉर्डन ग्रीनिज याने विंडीज संघाला दुहेरी शतक करून सामना जिंकवला होता. तर कायले मेयर्स हा कारनामा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

मृत्यूच्या दाढेतून वाचलेला कायले मेयर्स 

कायले मेयर्सला चटगाव कसोटीपूर्वी कोणीच ओळखत नव्हते. २०१७ रोजी मारिया वादळ आले होते. त्या वादळात कायले मेयर्स अडकला होता. त्यावेळी मेयर्स हा विंडवार्ड आयलैंड फ्रेंचाइजी संघाच्या ट्रेनिंग कैंपसाठी डोमिनिका येथे गेला होता. तेव्हा तिकडे मारिया वादळ आले होते. त्यावेळी मेयर्स याचा संपर्क तुटला होता.

ते वादळ इतके जबदरस्त होते की मेयर्स सोबत कितीतरी दिवस संपर्कच झालाच नव्हता. त्याच्या आई वडिलांना भीती वाटत होती. मेयर्ससोबत काही बरेवाईट तर घडले नसेल ना, या काळजीने ते चिंतातूर झाले होते. परंतु नशिबाने तो वाचला. त्यानंतर मेयर्स याने बार्बाडोस क्रिकेटमध्ये आपले नाव कमावले.

त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची इंग्लंड दौऱ्यावर संघात निवड करण्यात आली होती. इंग्लंड दौऱ्यावर त्याला पदार्पण करण्याची संधी नाही मिळाली. परंतु बांगलादेशविरुद्ध संधी मिळताच त्याने इतिहास रचला. यापुढेही त्याने अशीच भरीव कामगिरी करत राहावी, अशीच विंडीज क्रिकेट चाहत्यांची इच्छा असेल.

महत्वाच्या बातम्या:

जस्टिन लँगर यांच्या समर्थनात धावला स्टीव स्मिथ, म्हणाला

हम भी पेले गये थे, तुम भी पेले जाओगे! रिषभ पंतच्या फटकेबाजीनंतर भन्नाट मिम्स व्हायरल

विजय हजारे ट्रॉफीसाठी बडोदा संघाची घोषणा, मुंबई इंडियन्सच्या या स्टार खेळाडूकडे कर्णधारपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---