---Advertisement---

जपून रे बाबा! झेल टिपण्याच्या नादात प्रेक्षकाने वृद्धाच्या अंगावर मारली उडी; पाहा थरारक व्हिडिओ

On: रविवार, जानेवारी 2, 2022 8:14 PM
bbl-catch
---Advertisement---

सध्या सर्वत्र बिग बॅश लीग २०२१ (Big bash league)  स्पर्धेची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेत चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत आहेत. तर अशादेखील काही घटना पाहायला मिळत आहेत, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार शनिवारी (१ जानेवारी ) झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला आहे

तर झाले असे की, ब्रिस्बेन हिट (Brisbane heat)  संघाच्या डावातील ८ वे षटक सुरू होते. त्यावेळी रायले मेरेडिथ गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील एका चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या सॅम हेजलेटने स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका खेळला. त्यावेळी चेंडू प्रेक्षकांमध्ये जाऊन पडणार, इतक्यात एका प्रेक्षकाने झेल टिपण्यासाठी डाईव्ह मारली. तो चेंडू त्याच्या हाताला लागून दुसऱ्या प्रेक्षकाने एका हाताने जबरदस्त झेल टिपला.

परंतु डाईव्ह मारणाऱ्या प्रेक्षकाचा तोल गेला आणि तो सामना पाहण्यासाठी आलेल्या एका वयोवृद्ध प्रेक्षकाच्या अंगावर जाऊन पडला. सुदैवाने त्याला जास्त दुखापत झाली नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी आणखी एक घटना घडली होती. ज्यामध्ये सामना पाहण्यासाठी आलेला प्रेक्षक गंभीर दुखापतग्रस्त झाला होता. त्यावेळी देखील फलंदाजाने षटकार मारला होता, जो प्रेक्षकांच्या गर्दीत केला होता. त्यावेळी एका प्रेक्षकाला मागे पुढे होण्यास वेळ मिळेल, इतक्यात तो चेंडू त्याच्या डोक्याला जाऊन लागला होता.( Spectator jumped to catch the catch )

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर ब्रिस्बेन हिट संघाकडून जेम्स बाजलीने २८ चेंडुंमध्ये ४४ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर ब्रिस्बेन हिट संघाला २० षटकात ८ बाद १५० धावा करण्यात यश आले होते. प्रत्युत्तरात, होबार्ट हरीकेन्स (Hobart hurricanes) संघाला ८ बाद १३६ धावा करण्यात यश आले होते. यादरम्यान जेवियर बार्टलेटने ३० धावा खर्च करत ४ गडी बाद केले होते. हा सामना ब्रिस्बेन हिट संघाने १४ धावांनी आपल्या नावावर केला होता.

महत्वाच्या बातम्या :

रोहितला साध्य करायच्या होत्या ‘या’ सर्व गोष्टी, १० वर्षांपूर्वी केलेल्या संकल्पाचे जूणे ट्विट व्हायरल

यंदाचं वर्ष विश्वचषकाचं! क्रिकेट ते हॉकी २०२२ मध्ये रंगणार मोठ्या स्पर्धा, जाणून घ्या एकाच क्लिकवर

हे नक्की पाहा :

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---