ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार फिरकीपटू नेथन लायन याने धक्कादायक विधान केले आहे. त्याने सांगितले आहे की, त्याच्या संघातील खेळाडू यावर्षीच्या सुरुवातीला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू असताना घाबरले होते. मात्र, तशीच भीती त्यांनी ऍशेस मालिकेपूर्वी मनात ठेवू नये. खरं तर, ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा त्यांना भारताविरुद्ध ही मालिका 1-2ने गमवावी लागली होती. त्यांचे खेळाडू घाबरल्याचे दिल्ली कसोटीदरम्यान पाहायला मिळाले होते. या सामन्यात त्यांच्या फलंदाजांनी वळण घेणाऱ्या खेळपट्टीवर स्वीप शॉट खेळून विकेट्स गमावल्या होत्या.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) संघात ऍशेस मालिकेला 16 जूनपासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना (World Test Championship Final) खेळला जाणार आहे.
माध्यमांशी बोलताना नेथन लायन म्हणाला की, “आम्ही घाबरले नाही पाहिजे. भारतात आम्ही घाबरलो होतो आणि आम्हाला सर्वांना माहितीये की, त्यानंतर काय झाले. जर आम्ही त्या अनुभवातून धडा घेऊ शकलो आणि ज्याप्रकारे आपले क्रिकेट खेळतो, तसेच खेळलो, तर सर्वकाही ठीक होईल.”
इंग्लंडने त्यांच्या खेळात आक्रमकतेची भर घालत कसोटी क्रिकेटला नवीन रूप दिले आहे. त्यांनी मागील वर्षी 12 कसोटी सामन्यांपैकी 10 सामन्यात विजय मिळवला होता. याविषयी लायन म्हणाला की, “तुम्ही पाहिले असेल की, त्यांनी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानविरुद्ध कशाप्रकारचे क्रिकेट खेळले, ते त्यांच्या विरोधी संघांना घाबरवण्यात यशस्वी ठरले.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “आम्ही फक्त आमच्या खेळाविषयी विचार केला पाहिजे. आम्ही त्या गोष्टींबाबत विचार केला पाहिजे, ज्यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकतो. आम्हाला या गोष्टीची चिंता करायची नाहीये की, ते काय करत आहेत. जर आम्ही चांगली रणनीतीसोबत उतरलो आणि त्यानुसार खेळलो, तर सर्व ठीक होईल.”
लायनची कसोटी कारकीर्द
नेथन लायन हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून 119 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 223 डावांमध्ये 2.92च्या इकॉनॉमी रेटने 482 विकेट्स चटकावल्या आहेत. यामध्ये 50 धावा खर्च करत 8 विकेट्स ही त्याची डावातील सर्वोत्तम कामगिरी आहे. (spinner nathan lyon reveals we got scared in border gavaskar series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बोंबला! चेन्नईचे 16.25 कोटी पाण्यात, IPL मध्येच सोडून ‘या’ दिवशी मायदेशी परतणार स्टोक्स; लगेच वाचा
गुजरातचं कंबरडं मोडत भुवीने रचला इतिहास! IPLमध्ये एकदा नाही, तर दुसऱ्यांदा केली जबरदस्त कामगिरी






