वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा संपून आता 11 दिवस झाले आहेत. मात्र, भारतीय क्रिकेटप्रेमी हा पराभव अद्याप विसरले नाहीत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 19 नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे विश्वचषक 2023 अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याला संधी दिली नव्हती. अशात अश्विनने सांगितले की, रोहित शर्मा याने त्याची निवड अंतिम सामन्यादरम्यान का नव्हती केली, हे त्याला समजले आहे. तो असेही म्हणाला की, जर तो रोहितच्या जागी असता, तर विजयी संयोजनात बदल करण्यापूर्वी 100 वेळा विचार केला असता.
विश्वचषक 2023 (World Cup 2023) अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभवाचा धक्का बसला होता. तसेच, यासोबत भारताचे 12 वर्षांनंतर वनडे विश्वचषकाचा किताब जिंकण्याचे स्वप्नही भंगले होते. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळ केला होता. संघ सलग 10 सामने जिंकून अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र, अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
भारतीय संघ मागील काही वर्षांपासून आयसीसी स्पर्धांच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात येऊन पराभूत होत आहे. संघ दबावात आल्यानंतर विखुरतो. हीच गोष्ट विश्वचषक 2023 अंतिम सामन्यातही (World Cup 2023 Final) पाहायला मिळाली.
काय म्हणाला अश्विन?
विश्वचषक अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. जो संघ सलग विजय मिळवून आला होता, त्याच संघाला अंतिम सामन्यातही कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे अश्विनला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. याविषयी बोलताना अश्विन म्हणाला की, “जर मी रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या जागी संघाचा कर्णधार असतो, तर संघात बदल करण्यापूर्वी 100 वेळा विचार केला असता. कारण, हाच संघ सलग विजय मिळवत आला होता.”
“मी एका वेगवान गोलंदाजाला विश्रांती देऊन 3 फिरकीपटूंना का खेळवले असते ना. रोहित शर्माचा जो विचार होता, तो मी पूर्णपणे समजू शकत होतो. अंतिम सामना खेळणे खूप मोठी गोष्ट असते. मी याची तयारी करत होतो. मी सोशल मीडियापासूनही त्यावेळी दूर होतो. याव्यतिरिक्त मी यासाठीही तयार होतो की, जर संघात निवड झाली नाही, तर डगआऊटमधून संघाला पाठिंबा देईल,” असेही अश्विन पुढे म्हणाला.
रविचंद्रन अश्विन विश्वचषक 2023 (Ravichandran Ashwin World Cup 2023) स्पर्धेतील फक्त 1 सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्याने 10 षटके गोलंदाजी करताना 34 धावा खर्चून फक्त 1 विकेट घेतली होती. (spinner ravichandran ashwin reacts on not playing in world cup final 2023)
हेही वाचा-
IPL 2024मधून बाहेर पडलेल्या ‘या’ खेळाडूच्या गुडघ्याची सर्जरी, फोटो पाहिला का?
…तर सूर्यकुमार यादवच होणार पुढचा कर्णधार, विश्वचषकातही करेल नेतृत्व!