भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. संघ व्यवस्थापनाने टाकलेला विश्वास अश्विनने सार्थ ठरवत पहिल्या दोन्ही सामन्यात चमकदार कामगिरी केली. इंदोरमधील दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलिया संघाचे फलंदाज अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. संपूर्ण संघ अवघ्या 217 धावांवर संपुष्टात आला. अश्विनने सामन्यात केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे अनिल कुंबळे याचा विक्रम मोडीत निघाला.
अश्विनचा खास पराक्रम
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कौतुकास्पद गोलंदाजी केली. त्याच्या फिरकीपुढे फलंदाजांचा टिकाव लागला नाही. अश्विनने एकाच षटकात डेविड वॉर्नर आणि जोश इंग्लिस यांना तंबूत धाडले. याव्यतिरिक्त अश्विनने मार्नस लॅब्यूशेन याचीही विकेट घेतली. अश्विनने त्याच्या 7 षटकांच्या स्पेलमध्ये 41 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या.
Wicket No.2 for @ashwinravi99 🙌🙌
A carrom ball to dismiss Warner.
Live – https://t.co/OeTiga5wzy… #INDvAUS @IDFCFIRSTBank pic.twitter.com/yIRjjTejKJ
— BCCI (@BCCI) September 24, 2023
दुसऱ्या वनडेत अश्विनने 3 विकेट्स घेताच तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनला. अश्विनने अनिल कुंबळे (Anil Kumble) यालाही या विक्रमात पछाडले. कुंबलेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 142 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, आता अश्विनच्या नावावर 144 विकेट्सची नोंद झाली आहे.
पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली ऑस्ट्रेलियाची फलंदाजी फळी
पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचे प्रदर्शन निराशाजनक राहिले. मॅथ्यू शॉर्ट आणि स्टीव्ह स्मिथ यांना प्रसिद्ध कृष्णा याने सलग दोन चेंडूत तंबूचा रस्ता दाखवला. स्मिथ शून्यावर बाद झाला. तसेच, चांगली सुरुवात करणारा मार्नस लॅब्यूशेन मोठी खेळी करू शकला नाही.
दुसरीकडे, जोश इंग्लिस, कॅमरून ग्रीन आणि ऍलेक्स कॅरे यांनाही बॅटमधून खास प्रदर्शन करता आले नाही. डेविड वॉर्नर याने अर्धशतक झळकावले. मात्र, त्याच्या खेळीचा अंत अश्विनने 14व्या षटकात केले. ऑस्ट्रेलियाचा संघाचा संपूर्ण डाव 217 धावांवर संपुष्टात आला. (spinner ravichandran ashwin surpassed anil kumble and became highest wicket taker indian bowler against australia in odi ind vs aus)
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी विचारच केला नव्हता…’, सलग दुसऱ्या वनडेत कांगारूंना ठेचल्यानंतर कॅप्टन राहुलचे हैराण करणारे विधान
कौतुकास्पद! 44 वर्षीय इम्रान ताहिरने आपल्या संघाला बनवले CPL Champions, पोलार्डसेनेचा 9 विकेट्सने पराभव