फिरकीपटू साई किशोरनं नुकत्याच एका मुलाखतीत म्हटलं होतं की, तो भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहे. साई किशोर गेल्या काही काळापासून दमदार गोलंदाजी करतोय. या 27 वर्षीय फिरकीपटूनं 39 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण 166 विकेट घेतल्या आहेत.
साई किशोरनं गेल्या रणजी हंगामात शानदार गोलंदाजी केली होती. आता तो बुची बाबू स्पर्धेतही धुमाकूळ घालत आहे. साई किशोरनं तामिळनाडूचं नेतृत्व करताना हरियाणाविरुद्ध एका डावात 7 बळी घेतले होते. आता त्यानं बलाढ्य मुंबईविरुद्ध 5 विकेट घेतल्या आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो, बुची बाबू स्पर्धेत मुंबईकडून श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, सरफराज खान सारखे स्टार खेळाडू खेळत आहेत. यांच्याविरुद्ध साई किशोरनं 13.2 षटकांत 36 धावा देऊन 5 विकेट घेतल्या.
मुंबईविरुद्ध साई किशोरनं श्रेयस अय्यर, मुशीर खान, सरफराज खान, दिव्यांश सक्सेना आणि रेस्टन दास यांची विकेट घेतली. तामिळनाडूनं पहिल्या डावात 379 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, मुंबईची टीम 156 धावांत गारद झाली. यामध्ये साई किशोरच्या गोलंदाजीचं मोठं योगदान राहिलं. तसेच हरियाणाविरुद्ध ड्रॉ झालेल्या सामन्यात साई किशोरनं दोन डावांत मिळून एकूण 9 बळी घेतले होते. यामध्ये पहिल्या डावात घेतलेल्या 7 बळींचा समावेश आहे.
साई किशोरनं नुकतेच एका मुलाखतीत म्हटलं होतं की, त्याच्या मते तो देशाचा सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंपैकी एक आहे. “मला कसोटी क्रिकेटमध्ये संधी द्या, मी यासाठी तयार आहे”, असं वक्तव्य त्यानं केलं होतं. भारताला आगामी एका वर्षात अनेक कसोटी सामने खेळायचे आहेत. साई किशोरनं जर आपला हा फॉर्म कायम ठेवला, तर त्याला टीम इंडियात नक्कीच संधी मिळू शकते.
हेही वाचा –
‘मला बॅडमिंटनचा विराट कोहली व्हायचंय’, स्टार खेळाडूचं दिलखुलास वक्तव्य
फक्त एक फोन कॉल आणि डिल डन! झहीर खान असा बनला लखनऊचा मेंटॉर
‘खूप वाईट परिस्थिती…’, भारतीय क्रिकेटपटूचे कुटुंब पुरात अडकले, एनडीआरएफ टीम मदतीला!