आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आशिया चषकावर मोठे वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, भारतीय संघ आशिया चषक खेAnurag-Thakurळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही. ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवली जाईल. यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने असे झाले तर 2023मध्ये भारतात होणाऱ्या आयसीसी विश्वचषकातून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. अशात आता पीसीबीच्या या धमकीवर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले अनुराग ठाकूर?
क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Sports Minister Anurag Thakur) यांनी गुरुवारी (दि. 20 ऑक्टोबर) म्हटले की, भारतीय क्रिकेट संघाच्या पाकिस्तानमध्ये आशिया चषक 2023 स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय गृह मंत्रालय घेईल. अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी जय शाह (Jay Shah) यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर पत्रकारांशी चर्चा केली. यावर ते म्हणाले की, “खेळाडूंची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. भारतीय संघाच्या आशिया चषकासाठी जाण्याचा निर्णय गृह मंत्रालय घेईल.”
‘दहशतवादाच्या छायेत क्रिकेट खेळले जाऊ शकत नाही’
पुढे बोलताना ते म्हणाले की, “आम्ही आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळत आलो आहोत, पण द्विपक्षीय मालिकांबद्दल आमची आधी जी भूमिका होती, तीच आताही आहे. दहशतवादाच्या छायेत क्रिकेट खेळले जाऊ शकत नाही.” ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या संघांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतरही सुरक्षेबाबत शंका असल्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, “ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारताच्या स्थितीमध्ये फरक आहे.”
पुढील वर्षी आशिया चषकानंतर भारतात वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. याबद्दल बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, “भारतात विश्वचषक खेळण्यासाठी पात्र ठरलेल्या सर्व संघांना निमंत्रण दिले जाईल. भारत आता त्या स्थितीत नाहीये की, कोणाचेही ऐकेल आणि कुणाकडे ऐकवण्याचे कोणतेही कारण नाहीये. आम्ही सर्वांचे स्वागत करू आणि अपेक्षा आहे की सर्वजण येतील.”
टी20 विश्वचषकातील भारत- पाकिस्तान सामना
टी20 विश्वचषक 2022मधील भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामना येत्या 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे पार पडणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे हा सामनाही पावसामुळे रद्द होतो की, दोन्ही संघ मैदानात एकमेकांशी सामना करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विकेटकीपरऐवजी ऑलराऊडंर! दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला टी20 विश्वचषक संघात करावे लागले ‘हे’ बदल
श्रीलंकेची सुपर 12मध्ये धमाकेदार एंट्री, पराभूत होऊनसुद्धा नेदरलॅंड्सच्या पुढच्या फेरीच्या आशा कायम