लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएल 2023च्या दहाव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला 5 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. हा हैदराबादचा हंगामातील सलग दुसरा पराभव होता. इकाना क्रिकेट स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात हैदराबादचा पराभव झाला. यावेळी सामन्यादरम्यान हैदराबादची मालकीण काव्या मारन हीदेखील स्टेडिअममध्ये उपस्थित होती. यादरम्यान तिने पांढऱ्या, लाल आणि काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. हैदराबादने सामना गमावला असला, तरीही काव्याने सर्वांचे लक्ष वेधले. तिचा यादरम्यानचा व्हिडिओही तुफान व्हायरल होत आहे.
काव्या मारन (Kavya Maran) हिचा सामन्यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा सलामीवीर फलंदाज काईल मेयर्स हा बाद झाल्यानंतर खूपच खुश झाल्याचे दिसत आहे. यादरम्यान काव्याचा हा अंदाज चाहत्यांना खूपच आवडत आहे. त्यामुळेच चाहते तिच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.
Intha andamaina pilla ni yedipiyakandra plz 🥰 #kavyamaran #SunrisersHyderabad pic.twitter.com/7AtPCRs1XI
— AjayKumar (@Ajaythumati) April 7, 2023
ही घटना लखनऊच्या डावातील पाचव्या षटकात घडली. यादरम्यान हैदराबादकडून फजलहक फारुकी हा गोलंदाजी करत होता. त्याने या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मेयर्स याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू आणि बॅटचा संपर्क योग्यप्रकारे झाला नाही. त्यामुळे चेंडू दूर जाऊ शकला नाही. यामुळे झाले असे की, सीमारेषेच्या पलीकडे क्षेत्ररक्षण करत असलेल्या मयंक अगरवाल याने शानदार पद्धतीने झेल पकडला. यानंतर मेयर्सला तंबूत परतावे लागले. मेयर्सची 13 धावांवर विकेट पडताच काव्या मारनचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती तिच्या जागेवर उभी राहिली आणि हात पसरून जल्लोष करू लागली. तिच्या व्हिडिओला आतापर्यंत 17 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
सामन्याचा आढावा
या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 121 धावा केल्या होत्या. यावेळी लखनऊकडून कृणाल पंड्या याने 3 विकेट्स घेतल्या. हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊने 16 षटकातच 5 विकेट्स गमावत 127 धावा केल्या. यावेळी लखनऊसाठी केएल राहुल (35) आणि कृणाल पंड्या (34) यांनी सिंहाचा वाटा उचलला. या सामन्यातील कामगिरीसाठी पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. (srh owner kavya maran jumped with joy when kyle mayers got out see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईशी भिडण्याआधीच सीएसकेला मोठा झटका! अष्टपैलू पायाच्या दुखापतीमुळे माघार घेण्याच्या तयारीत
महत्वाच्या सामन्याआधी मुंबईसाठी धोक्याची घंटा! प्रमुख खेळाडूच्या दुखापतीचे संकेत