---Advertisement---

IPL: नाद खुळा! ‘मियाँ मॅजिक’ने झहीर खानचा मोठा विक्रम मोडला

On: सोमवार, एप्रिल 7, 2025 11:49 AM
---Advertisement---

रविवारी गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ‘मियाँ जादू’ दाखवली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये 17 धावा देत चार विकेट्स घेतल्या. सिराजने अभिषेक शर्मा (18), ट्रॅव्हिस हेड (8), अनिकेत वर्मा (18) आणि सिमरजीत सिंग (0) यांचे बळी घेतले. ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. 31 वर्षीय सिराजने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये विकेटचे शतकही गाठले. त्याच्या नावावर सध्या 97 आयपीएल सामन्यांमध्ये 102 विकेट्स आहेत. त्याने माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानचा विक्रम मोडला आहे.

आयपीएलमध्ये 100 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा सिराज हा 26वा गोलंदाज ठरला आहे. सिराज आयपीएलमध्ये 100 विकेट्स पूर्ण करणारा संयुक्त सातवा भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे. सिराज व्यतिरिक्त, शार्दुल ठाकूरनेही 97 सामन्यांमध्ये बळींचे शतक केले. झहीरने आयपीएलमध्ये 99 सामन्यांमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या होत्या. हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमार हे सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज आहेत. दोघांनीही 81-81आयपीएल सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. त्याच्यानंतर आशिष नेहरा (83 सामने), संदीप शर्मा (87 सामने), जसप्रीत बुमराह (89 सामने), मोहित शर्मा (92 सामने) आणि मोहम्मद शमी (97 सामने) यांचा क्रमांक लागतो.

हैदराबादमध्ये जन्मलेल्या सिराजने 2017 मध्ये हैदराबादसाठी आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो आयपीएल 2018 च्या आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील झाला आणि सात वर्षे तिथेच राहिला. सिराज पहिल्यांदाच गुजरातकडून खेळत आहे. सिराजच्या घातक गोलंदाजीमुळे गुजरातने हैदराबादला 152/8 च्या धावसंख्येवर रोखले. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने 16.4 षटकात 7 विकेट्स राखून सामना जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---