लैंगिक छळाच्या आरोपातून निर्दोष सुटल्यानंतर श्रीलंकेचा क्रिकेटर दानुष्का गुणतिलाका याच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या खेळाडूवर लादण्यात आलेली सर्व बंदी हटवण्याची घोषणा केली आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक काढुन सांगितले आहे की, गुणतिलाका याच्यावर ऑस्ट्रेलियातील आरोपांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र तपास समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी गुणतिलाका याच्यावरील बंदी पूर्णपणे हटवण्याची शिफारस केली आहे.
ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्सच्या जिल्हा न्यायालयाने गुणतिलाकाची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली, त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी तो दीर्घ कालावधीनंतर श्रीलंकेत परतला. श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने दानुष्का गुणतिलाकाला (Danushka Gunathilaka) लैंगिक छळाच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियात अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर टी-20 विश्वचषक 2022 दरम्यान क्रिकेट खेळ्यावर बंदी घातली होती. त्याच्यावर लादलेली ही बंदी कायदेशीर कारवाईचा निकाल लागेपर्यंत होती.
त्याच्यावरील आरोपांची चौकशी आणि प्रवासास बंदी असल्यामुळे गुणतिलाका याला ऑस्ट्रेलियात 11 महिने काढावे लागले. त्याने कायदेशीर लढाई पूर्ण केली आणि अखेरीस आरोपातून निर्दोष मुक्त झाला. श्रीलंकेच्या फलंदाजावरील बंदी उठल्यानंतर हा स्टार खेळाडू लवकरच क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे.
गुणतिलाका हा श्रीलंकेचा प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. 32 वर्षीय खेळाडूने श्रीलंका संघासाठी 8 कसोटी सामने, 47 एकदिवसीय सामने आणि 46 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. डावखुऱ्या फलंदाजाने कसोटीत 299 धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1601 धावा आणि टू-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 741 धावा केल्या आहेत. गुणतिलकाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन शतकेही झळकावली आहेत. (Sri Lanka Cricket Board has lifted the ban leading batsman banned over sexual harassment allegations)
महत्वाच्या बातम्या –
SAvNED: दक्षिण आफ्रिकेचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, असे आहेत दोन्ही संघ
SAvNED: दक्षिण आफ्रिकेचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, असे आहेत दोन्ही संघ