सन 2023 हे क्रिकेटचे वर्ष आहे असं म्हणतात ते उगाच नाही. भारताने नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध वनडेपाठोपाठ टी20 मालिका खेळली. आता 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरू होत आहे. या कसोटी मालिकेपू्र्वी वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. याच संदर्भात श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने याने मोठी भविष्यवाणी केली आहे. बघूया नेमके काय म्हणाला जयवर्धने…
भारताला भारताच्याच मैदानावर हरवणे कोणत्याही संघासाठी सोपे नाही. भारतीय संघाचा सामना करणे हे विरोधी संघांसाठी मोठे आव्हान असते. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघालाही भारताचा नियमित पराभव करता आला नाहीये. 2004पासून ऑस्ट्रेलियन संघ भारतात कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही, पण यावेळी पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या नेतृत्वाखालील संघाकडून खूप अपेक्षा केली जात आहे. यावेळी ऑस्ट्रेलिया इतिहास रचू शकेल, असा विश्वास श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यानेही व्यक्त केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India And Australia) यांच्यातील कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) या नावाने खेळल्या जाणाऱ्या या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज आणि फलंदाजाना आव्हान देऊन भारतीय संघ कशी कामगिरी करतो, यावर सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे. ऑस्ट्रेलियन संघाचे उत्कृष्ट आक्रमण भारतीय संघासाठी आव्हान उभे करू शकते. या कामगिरीवरच मालिकेचा निर्णय अवलंबून असेल.
माहेला म्हणाला की, “कोणता संघ मालिकेची चांगली सुरुवात करतो यावर संघाचा विजय अवलंबून आहे. मालिकेत लवकर आघाडी घेणे खूप महत्त्वाचे असेल.” आयसीसी रिव्ह्यू शोमध्ये अँकर संजना गणेशनच्या प्रश्नांना उत्तरे देताना जयवर्धनेने या मालिकेची सुरुवात खूप महत्त्वाची असेल असे मान्य केले. तसेच तो म्हणाला, “मालिकेच्या विजेत्याचा अंदाज बांधणे कठीण आहे, पण मला वाटते की, ऑस्ट्रेलिया ही मालिका जिंकेल. कदाचित ऑस्ट्रेलिया 2-1 ने जिंकेल, परंतु ते खूप कठीण होणार आहे.”
जयवर्धनेच्या या आशेमागे आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आहे. सध्या आयसीसी जागतिक कसोटी क्रमवारीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहेत. ऑस्ट्रेलियाने याआधीच या अंतिम फेरीसाठी पहिल्या क्रमांकावर पात्र ठरला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताला आपले स्थान निश्चित करण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकणे आवश्यक आहे. जर भारताने ऑस्ट्रेलियाकडून ही मालिका गमावली, तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेला अंतिम फेरीत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मार्चमध्ये होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यातही श्रीलंकेला कमाल दाखवावी लागणार आहे. (Sri Lanka Former cricketer captain Mahela Jayawardene said Australia win the test series 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय दिग्गजाच्या एकाच ट्वीटने देशभरात माजवली खळबळ; नेटकरी म्हणाले, ‘तुझा आदर आहे, पण तू दलाल…’
धक्कादायक! प्रसिद्ध टेनिसपटूने स्वत:च्याच एक्स गर्लफ्रेंडला कारमधुन ढकलेले