---Advertisement---

…. म्हणून इंग्लंडच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली, कर्णधार जो रूटने केले स्पष्ट 

On: रविवार, जानेवारी 3, 2021 1:01 PM
---Advertisement---

इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्याने त्यांच्या 2021 वर्षातील त्यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. या दौऱ्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या दौऱ्याआधी इंग्लंडचे काही काळ कोणतेही सामने झाले नव्हते. खरंतर इंग्लंड संघ 2021 मध्ये 17 कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला काही विश्रांती देण्यात आली, अशी माहिती कर्णधार जो रूटने दिली.

इंग्लंड संघाला श्रीलंके विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळावी लागणार आहे. त्यानंतर इंग्लंड संघ भारताच्या दौर्‍यावर येणार आहे. या ठिकाणी चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. इंग्लंड श्रीलंका विरुद्धचा पहिला कसोटी 14 आणि 18 जानेवारी दरम्यान खेळणार आहे.

इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट श्रीलंका दौर्‍यावर जाण्यापूर्वी शनिवारी म्हणाला, “आम्ही येणार्‍या दौऱ्यात खूप क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेतून जाणे सगळ्यांना शक्य होणार नाही. त्यामुळे खेळाडूंना विश्रांती देणे पुढील चरणातील सामन्यांसाठी महत्त्वाचा भाग आहे. खेळाडूंचे मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. कारण या स्थितीत खेळाडूंना भरपूर सामने खेळायचे आहेत. त्यामुळे हे एक मोठे आव्हान असणार आहे. ”

इंग्लंड संघाला या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया सोबत ऍशेज मालिका खेळायची आहे. याबद्दल बोलताना जो रूट म्हणाला,” आम्हाला संघ निवड करताना खूप सजग रहावे लागेल. ज्यामुळे अशा लोकांना संधी मिळेल, जे प्रबळ दावेदार आहेत.”

या मालिकेनंतर इंग्लंडचा संघ भारतीय दौर्‍यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 4 कसोटी सामने,5 टी-20 सामने आणि तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

“एका क्षणात माझेच देशावासी माझ्याविरुद्ध झाले”, भारतीय क्रिकेटपटूंच्या जेवणाचे बील भरणाऱ्या चाहत्याचे ट्विट

एमएस धोनीची मुलगी झिवा दिसणार ‘या’ जाहिरातीमध्ये ?

पुजारा, पृथ्वी शॉ आणि मॅथ्यू वेड झाले दुखापतग्रस्त, तिघांबाबत होते ‘हे’ साम्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---