---Advertisement---

भारत-श्रीलंका संघातील पहिल्या वनडेत येणार का पावासाचा व्यत्यय? पाहा काय आहे हवामानाचा अंदाज

On: शनिवार, जुलै 17, 2021 11:07 PM
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारपासून(१८ जुलै) वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका आर प्रेमादासा स्टेडियमवर होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता सामने सुरु होतील. या मालिकेसाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. दोन्ही संघात अनेक युवा खेळाडू असल्याने त्यांच्यासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. मात्र, ही मालिका सुरु होण्यापूर्वीच क्रिकेटप्रेमींसाठी निराशाजनक बातमी समोर येत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान पावसाच्या व्यत्ययाची शक्यता आहे.

रविवारी असे असेल वातावरण
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पहिल्या वनडे सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोमध्ये खेळल्या जाणार्‍या या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान २८ अंश सेल्सिअस तापमान राहील. अद्रतेचे प्रमाण ७८% असेल. तसेच २३ किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील.

श्रीलंकेविरुद्ध भारताचे रेकॉर्ड चांगले
भारत आणि श्रीलंका यांच्यात एकूण १५९ वनडे सामने झाले असून, त्यापैकी ९१ सामने भारतीय संघाने तर ५६ सामने श्रीलंकेच्या संघाने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील १ सामना बरोबरीत सुटला असून ११ सामने अनिर्णीत राहिले आहेत.

अशी होणार वनडे मालिका
भारताच्या श्रीलंका दौऱ्यातील सामन्यांना १८ जुलैपासून वनडे मालिकेने सुरुवात होईल. १८ जुलैनंतर २० आणि २३ जुलै रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा वनडे सामना खेळला जाईल. हे तीनही वनडे आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवले जातील. तसेच भारतीय प्रमाणवेळेनुसार तिन्ही सामन्यांना दुपारी ३ वाजता सुरुवात होईल.

वनडे मालिकेसाठी दोन्ही संघ – 
भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल.

श्रीलंका संघ – दसून शनका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथम निसान्का, चरिथ असलांका, वनिंदू हसरंगा, अशेन बंदरा, मिनोद भानुका, लाहिरू उडारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुशमंथा चमीरा, लक्षण संदकन, अकिला धनंजया, शिरन फर्नांडो, धनंजय लक्ष्मण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रम, असिता फर्नांडो, कसून रजीता, लाहिरू कुमारा, इसुरु उडाना.

महत्त्वाच्या बातम्या –

तब्बल ११० किलो वजनाच्या आजम खानने केले आंतरराष्ट्रीय पदार्पण, पण पहिल्याच सामन्यात झाला प्रचंड ट्रोल

चर्चा तर होणारच! संघ हरला, पण नागवराच्या सेलिब्रेशनने वेधले सर्वांचेच लक्ष, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

चौकार अन् षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या रसेलचा गोलंदाजीत राडा; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---