---Advertisement---

केव्हा, कुठे आणि कसा पाहाल श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसरा वनडे सामना? जाणून घ्या सर्वकाही

On: शुक्रवार, जुलै 23, 2021 7:00 AM
---Advertisement---

कोलंबो। भारताचा मर्यादीत षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात श्रीलंका आणि भारत संघात सध्या ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील अखेरचा सामना शुक्रवारी (२३ जुलै) होणार आहे.

मालिकेत आघाडीवर आहे भारतीय संघ
या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने पूर्ण झाले आहेत. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून मालिकेत २-० अशी आघाडी विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे शुक्रवारी होणारा तिसरा सामना जिंकून श्रीलंकेला त्यांच्याच मायभूमीत व्हाईटवॉश देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. तर श्रीलंका संघ व्हाईटवॉश टाळून आपली प्रतिष्ठा वाचवण्याच्या दृष्टीने तिसऱ्या सामन्यात उतरेल.

भारतीय संघाच्या अंतिम ११ जणांमध्ये बदल होण्याची शक्यता
भारतीय संघाने मालिका आधीच खिशात घातलेली असल्याने संघव्यवस्थापन तिसऱ्या वनडेसाठी अंतिम ११ जणांच्या संघात बदल करु शकतात. काही खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना या सामन्यासाठी संधी दिली जाऊ शकते. यात पृथ्वी शॉ ऐवजी देवदत्त पडीक्कल किंवा ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी एकाला, तसेच इशान किशन ऐवजी संजू सॅमसन, मनिष पांडे ऐवजी नितीश राणा आणि कुलदीप यादव ऐवजी चेतन साकारिया किंवा वरुण चक्रवर्ती यांना संधी दिली जाऊ शकते.

आमने-सामने कामगिरी
हे दोन संघ आजपर्यंत १६१ वनडे सामन्यांत आमने-सामने आले आहेत. त्यातील ९३ सामन्यांत भारताने बाजी मारली आहे, तर श्रीलंकेने ५६ सामने जिंकले आहेत. तसेच या २ संघांतील १ सामना बरोबरीत सुटला असून ११ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

कधी, कुठे आणि केव्हा होणार श्रीलंका विरुद्ध भारत तिसरा वनडे सामना घ्या जाणून –

१. श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसरा वनडे सामना केव्हा होणार?
– श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसरा वनडे सामना २३ जुलै रोजी खेळला जाणार आहे.

२. श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसरा वनडे सामना कुठे खेळवला जाणार ?
– श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसरा वनडे सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे खेळवला जाईल.

३. श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसरा वनडे सामना किती वाजता सुरु होणार ?
– श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसरा वनडे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.०० वाजता सुरु होईल. त्याआधी दुपारी २.३० वाजता नाणेफेक होईल.

४. श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल ?
– श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.

५. श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
– श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या वनडे सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण Sony Liv या ऍपवर पाहाता येईल.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ – 

भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल.

श्रीलंका संघ – दसून शनका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्ष, पथम निसान्का, चरिथ असलांका, वनिंदू हसरंगा, अशेन बंदरा, मिनोद भानुका, लाहिरू उडारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुशमंथा चमीरा, लक्षण संदकन, अकिला धनंजया, शिरन फर्नांडो, धनंजय लक्ष्मण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रम, असिता फर्नांडो, कसून रजीता, लाहिरू कुमारा, इसुरु उडाना.

महत्त्वाच्या बातम्या – 

मैदानातच नाही, तर मैदानाबाहेरही दीपक चाहरचा जलवा! गिटार वाजवत रंगवली जुन्या गाण्यांची मैफील, व्हिडिओ व्हायरल

दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर अख्ख्या श्रीलंका संघाला ठोठावण्यात आला दंड, ‘हे’ आहे कारण

बाजीगर रिषभ! कोरोनावर मात करून परतल्यानंतर टीम इंडियाने पंतचे असे केले ‘ग्रँड वेलकम’, पाहा फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---