Shivam Dube :- भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 बाद 230 धावा केल्या. या सामन्यातून अष्टपैलू शिवम दुबे याचे 5 वर्षांनंतर वनडे संघात पुनरागमन झाले. पुनरागमनाच्या सामन्यात दुबेने चमकदार कामगिरी केली.
दुबेने डिसेंबर 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सामन्यात पदार्पण केले होते. हा पदार्पणाचा सामनाच त्याचा शेवटचा वनडे सामना ठरला. कारण त्या सामन्यानंतर दुबेला पुन्हा वनडे क्रिकेट खेळण्यासाठी जवळपास 55 महिने वाट पाहावी लागली. अखेर श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यांत कर्णधार रोहित शर्माने दुबेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. या सामन्यात दुबेने 13व्या षटकांतील पहिल्या चेंडूवर कुसल मेंडिसला पायचीत केले. ही त्याची वनडेतील मेडन विकेट ठरली. दुबेने 4 षटके फेकताना केवळ 19 धावा खर्च करुन 1 यश मिळवले.
दरम्यान या सामन्यात भारताकडून 7 खेळाडूंनी गोलंदाजी केली. दुबेव्यतिरिक्त अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही प्रत्येकी एका श्रीलंकन फलंदाजाला पव्हेलियनला पाठवले. तर शुबमन गिलने या सामन्यात प्रथमच गोलंदाजी केली. मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्याने आपल्या एका षटकांत 14 धावा खर्च केल्या.
भारत आणि श्रीलंका संघांचे प्लेइंग इलेव्हन
भारताची प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.
श्रीलंका संघाची प्लेइंग इलेव्हन- पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदिरा समविक्रमा, चारिथ असलंका, जेनिथ लियानागे, वानेंदू हसरंगा, दुनिथ वेलालागे, अकिला धनंजय, असिता फर्नांडो, मोहम्मद शिराज.
महत्त्वाच्या बातम्या-
“अरे माझ्याकडे काय बघतोय?”, श्रीलंकन फलंदाजाच्या विकेटवरुन गोंधळलेल्या रोहितची मजेशीर प्रतिक्रिया
आयपीएलवाला रूल है क्या! भारतीय खेळाडूंचा मजेशीर संवाद स्टंप माईकमध्ये कैद, व्हिडिओ व्हायरल