---Advertisement---

श्रीलंकेचा डावाने दमदार विजय, ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का; तब्बल १२ विकेट्सह पदार्पणात चमकला जयसूर्या

Sri Lanka vs AUS
---Advertisement---

सोमवारी (११ जुलै) श्रीलंकेने गॉलमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि ३९ धावांनी पराभूत केले आहे. यासह त्यांनी २ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. श्रीलंकेच्या विजयात प्रबत जयसुर्या आणि दिनेश चंडिमल यांनी मोलाची भूमिका पार पाडली. त्यामुळे प्रबत सामनावीर, तर चंडिमल मालिकावीर ठरला. 

या सामन्यात (Sri Lanka vs India) ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ११० षटकात सर्वबाद ३६४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्यूशेनने १०४ धावांची, तर स्टिव्ह स्मिथने नाबाद १४५ धावांची शतकी खेळी केली. अन्य फलंदाजांना फार काही करता आले नाही. श्रीलंकेकडून प्रबतने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेकडून दिनेश चंडिमलने सर्वाधिक २०६ नाबाद खेळी केली. त्याच्याशिवाय कर्णधार दिमुथ करुणारत्नेने ८६ आणि कुशल मेंडिसने ८५ धावा केल्या. तसेच अँजेलो मॅथ्यूज आणि कामिंडू मेंडिसनेही अर्धशतकी खेळी केली. मॅथ्यूजने ५२ धावा आणि कामिंडूने ६१ धावा केल्या.

करुणारत्ने आणि मेंडिस यांच्यात १५२ धावांची, तसेच चंडिमल आणि कामिंडू यांच्यात १३३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. त्यामुळे श्रीलंकेने १८१ षटकात सर्वबाद ५५४ धावा केल्या. तसेच १९० धावांची आघाडीही घेतली. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

यानंतर दुसऱ्या डावात मात्र ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोसळली. त्यांना दुसऱ्या डावात श्रीलंकेची आघाडी मोडून काढत लक्ष्य देण्याचे आव्हान होते. पण,  श्रीलंकेची आघाडीच ऑस्ट्रेलियाला मोडता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ४१ षटकात १५१ धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे त्यांच्यावर सामन्याच्या चौथ्याच दिवशीच एका डावाने पराभूत होण्याची वेळ आली.

ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात मार्नस लॅब्यूशेनने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कोणालाही ३० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. दुसऱ्या डावातही प्रबतने शानदार गोलंदाजी करताना ६ विकेट्स नावावर केल्या. त्यामुळे या सामन्यातील त्याच्या विकेट्सची संख्या १२ वर गेली. विशेष गोष्ट अशी की प्रबतचा हा पदार्पणाचा कसोटी सामना होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

इंग्लंडची झोप उडवणाऱ्या सूर्यकुमारलाच लागेना झोप! पत्नीने केला रात्रीचा व्हिडिओ शेअर

बाप तसा बेटा! बेकहमच्या फ्री-किक पुनरावृत्ती झाली त्याच्याच मुलाकडून, पाहा व्हिडिओ

भारतासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या ‘या’ दिग्गज खेळाडूची होणार हकालपट्टी?, खराब फॉर्म हेच कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---