मागील काही दिवसांपूर्वीच भारत आणि श्रीलंका संघात एकदिवसीय आणि टी२० सामन्यांची मालिका खेळण्यात आली होती. यामध्ये एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. तर टी२० मालिकेत श्रीलंका संघाने २-१ ने विजय मिळवला होता. ही टी२० मालिका संपल्यानंतर श्रीलंकेचा अष्टपैलू इसरु उडाना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या इसरु उडानाने निवृत्तीमागील कारण सांगितले होते की, तो आपल्या देशातील तरुण खेळाडूंसाठी मार्ग मोकळा करत आहेत. परंतु, त्यामागचे खरं कारण वेगळेच आहे. त्याच्याआधी ३२ वर्षीय थिसारा परेराने देखील निवृत्ती घेतली होती.
तसं पाहिलं तर ३२ किंवा ३३ हे वय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे वय नाही. कारण बऱ्याच वेळा असे दिसून येते की, बरेच खेळाडू या वयात सर्वोत्तम कामगिरी करत असतात. परंतु, या वयात श्रीलंकेचे क्रिकेटपटू कोणत्याही एका स्वरूपामधून नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना दिसले आहेत. इसुरु उडानाने निवृत्तीनंतर आपली भूमिका मांडत म्हटले होते की, “माझे असे मत आहे की, खेळाडूंच्या पुढच्या पिढीसाठी जागा रिकामी करण्याची वेळ आली आहे.”
पण नॅशनल डॉट एलकेच्या वृत्तानुसार अशी माहिती समोर आली आहे की, उडानानंतर अजून काही श्रीलंकन खेळाडू निवृत्तीची घोषणा करू शकतात. थिसारा परेरानंतर निवृत्ती घेतलेला उडाना हा श्रीलंकेच्या मर्यादित षटकांच्या रँकमधील दुसरा हाय-प्रोफाइल खेळाडू आहे. उडानाच्या अगोदर परेराने मे महिन्यात निवृत्तीची घोषणा केली होती. यामागील कारण म्हणजे कसोटी आणि मर्यादित षटकांच्या स्वरूपामध्ये वरिष्ठ खेळाडू थिसारा परेराला प्रमोद विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीच्या नवीन पॅनलने राष्ट्रीय संघात निवडण्याकडे दुर्लक्ष केले होते.
यानंतर परेराने अँजेलो मॅथ्यूज आणि सुरंगा लकमल यांना स्पष्ट संदेश दिला होता की, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, लाहिरू थिरिमन्ने आणि नुवान प्रदीपसारख्या वरिष्ठ खेळाडूंकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्याच बरोबर भविष्यात त्यांना फक्त गुणवत्तेच्या आधारे संधी दिली जाणार आहे, अनुभवावर नाही. त्यामुळे संघातील वरिष्ठ खेळाडू क्रिकेटला रामराम करण्याच्या विचारात आहे.
परेरा आणि उडानानंतर आणखी एक आघाडीचा वेगवान गोलंदाज आगामी दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेपूर्वी निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या शेवटच्या दौऱ्यात शिस्तीचा भंग केल्याबद्दल एसएलसीने एक वर्षांची बंदी घातलेल्या तीन खेळाडूंपैकी एक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. तो खेळाडू यूएसएसाठी खेळण्याचा विचार करत आहे, याची माहिती सूत्रांकडून दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अतिउत्तम! ‘या’ देशाचे क्रिकेटरही खेळणार आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात, भारतासोबतच धरणार युएईची वाट
मयंक पहिल्या कसोटीतून बाहेर, सलामीसाठी ‘हे’ ३ पर्याय उपलब्ध; एक नाव अनपेक्षित
‘येथे जिंकण्याव्यतिरिक्त काहीही नको’, इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे विराटने फुंकले रणशिंग