IND vs SL, 1st T20 :- भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात बऱ्याच चित्तथरारक घडामोडी पाहायला मिळाल्या. यापैकी एक होती कामिंदू मेंडिसची अनोखी गोलंदाजी. कामिंदू मेंडिसने संपूर्ण सामन्यात एकच षटक टाकले, मात्र त्याच्या गोलंदाजी शैलीने सर्वांचे लक्ष वेधले. मेंडिसने एकाच षटकात उजव्या आणि डाव्या हाताने गोलंदाजी केली. मात्र, श्रीलंकेच्या गोलंदाजाने अशी गोलंदाजी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असे घडले आहे.
1996 मध्ये, भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या वनडे विश्वचषकादरम्यान, हसन तिलकरत्नेने केनियाविरुद्ध कँडी येथे झालेल्या सामन्यात दोन्ही हातांनी गोलंदाजी केली होती. त्यावेळीही क्रिकेट चाहते या श्रीलंकन गोलंदाजाची अनोखी गोलंदाजी पाहून थक्क झाले होते. हा तोच सामना होता ज्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 398 धावा केल्या होत्या आणि अरविंदा डी सिल्वाने झंझावाती शतक झळकावले होते.
हसन तिलकरत्नेला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत वनडेत केवळ 6 विकेट्स घेता आल्या होत्या. कारण तो यष्टीरक्षक फलंदाज होता. तो चांगला यष्टिरक्षक होता. त्याने श्रीलंकेसाठी 83 कसोटी आणि 200 वनडे सामने खेळले आणि बॅटनेही चांगली कामगिरी केली होती.
Before Kamindu Mendis, there was Hashan Tilakaratne. And before him, there was Hanif Mohammad too apparently but no footage exists of his ambidexterity. pic.twitter.com/rqTDgalAIo
— TheRandomCricketPhotosGuy (@RandomCricketP1) July 27, 2024
कामिंदू मेंडिसने हसन तिलकरत्नेच्या शैलीची पुनरावृत्ती केली
आता कामिंदू मेंडिसबद्दल बोलूया. तो एक अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याने श्रीलंकेसाठी तीन कसोटी, सात वनडे आणि 14 टी20 सामने खेळले आहेत. त्याने बॅटने चांगल्या धावा केल्या आहेत पण चेंडूने तो अजून काही खास करू शकलेला नाही. मात्र यावेळी त्याने आपल्या गोलंदाजीच्या शैलीने सर्वांनाच चकित केले आहे.
Kamindu Mendis bowling left arm to Suryakumar Yadav and right arm to Rishabh Pant. 😄👌 pic.twitter.com/ZBBvEbfQpS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 27, 2024
जेव्हा सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत, ही उजव्या-डाव्या फलंदाजांची जोडी मैदानावर होती, तेव्हा कामिंदू मेंडिस सूर्यकुमार यादवला डाव्या हाताने आणि रिषभ पंतला उजव्या हाताने गोलंदाजी करत होता. कामिंदू मेंडिसची ही गोलंदाजी शैली सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी त्याला एक चांगला क्रिकेटर बनवण्यासाठी…”, रिकी पाँटिंगने केला या क्रिकेटरबद्दल खळबळजनक खुलासा
संजू सॅमसननं जिंकलं चाहत्यांच हृदय…!!! पहिल्याच टी20 सामन्यात केलं असं काहीतरी…
शाब्बास मनू! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं जिंकलं पहिलं मेडल; नेमबाजीत कांस्य पदकावर निशाणा