---Advertisement---

श्रीलंकन क्रिकेटपटू कुशल मेंडिस अडकला विवाहबंधनात, संघ सहकाऱ्याने फोटो शेअर करत दिली माहिती

On: शनिवार, फेब्रुवारी 13, 2021 10:15 PM
---Advertisement---

सध्या कोरोना काळानंतर लग्नसराईचे दिवस अवतरले आहेत असे म्हणायला हरकत नाही. अनेक प्रसिद्ध व्यक्ती सध्या विवाह करत आहेत. यात आता श्रीलंकेचा मधल्या फळीतील फलंदाज कुशल मेंडिस याचीही भर पडली आहे.

कुशल नुकताच लग्नबंधनात अडकल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याने निशेलसह लग्नगाठ बांधली. श्रीलंकेचा अव्वल अष्टपैलू खेळाडू आणि कुशल मेंडिसचा संघसहकारी अँजेलो मॅथ्यूजने ट्विटरवर पोस्ट करत ही माहिती दिली.

अँजेलो मॅथ्यूजने या पोस्टमध्ये कुशल मेंडिसच्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. यासह कुशल मेंडिसचे आणि त्याची पत्नी निशेलचे अभिनंदन केले आहे. तसेच या नवदाम्पत्याला पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. मॅथ्यूजच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत कुशलला आणि त्याच्या पत्नीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कुशल मेंडिसची कारकीर्द

उजव्या हाताने फलंदाजी करणारा कुशल मेंडिस श्रीलंकेकडून तीनही फॉरमॅटमध्ये खेळतो. श्रीलंकेकडून आत्तापर्यंत ४७ कसोटी सामने खेळतांना त्याने ३४.७३च्या सरासरीने ३०२२ धावा केल्या आहेत. तसेच ७६ वनडे सामन्यात ३०.५२च्या सरासरीने २१६७ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने २६ टी-२० सामनेही खेळले असून त्यात १८.६१ च्या सरासरीने ४८४ धावा केल्या आहेत.

कुशलची मधल्या फळीतील एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळख आहे. परंतु सातत्याचा अभाव असल्याने तो बरेचदा संघातील स्थान टिकवू शकत नाही. आगामी काळात यात सुधारणा करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

महत्वाच्या बातम्या:

रोहित शर्माच्या पहिल्या चौकरातच विराट कोहली झाला भलताच खुश! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Valentines Week Special : हमारी अधुरी कहानी! १० भारतीय दिग्गज क्रिकेटपटू व त्यांच्या एक्स गर्लफ्रेंड्स

जेव्हा रोहितने वाढवले रितीकाचे टेन्शन, बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---