---Advertisement---

श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू सापडला कोरोनाबाधित, नुकताच झाला होता वरिष्ठ संघात सामील

On: रविवार, जुलै 11, 2021 2:32 AM
---Advertisement---

भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेस सुरुवात होण्यापूर्वी श्रीलंकेचा संघ चांगलाच कोरोना संसर्गाच्या जाळ्यात सापडला असून, यजमान संघाच्या दोन बायो-बबलपैकी एका बायो-बबलमध्ये एका खेळाडूचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. कोरोना संसर्गामुळे मालिका आधीच चार दिवस पुढे ढकलण्यात आली असल्याने खेळाडू दोन गटात स्वतंत्रपणे सराव करत आहेत. यजमान संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि कामगिरी विश्लेषक जीटी निरोशन यांना यापूर्वीच कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे.

हा खेळाडू आढळला कोरोना संक्रमित
श्रीलंकेतील मोठे वृत्तपत्र असलेल्या न्यूजवायर आयकेच्या सूत्रांनुसार, फलंदाज सँडून वीराकोडी देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. वीराकोडी त्या १५ वरीष्ठ खेळाडूंबरोबर होता जे सिनामन ग्रँड हॉटेलमध्ये थांबले आहेत. भानुका राजपक्षे आणि इतर अनेक क्रिकेटपटूंना शुक्रवारी रात्री दांबुला येथे भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी सराव सामना खेळण्यासाठी पाठविण्यात आले होते, असेही या बातमीत म्हटले.

दांबुला येथे २६ श्रीलंकन क्रिकेटपटूंचा वेगळा गट बायो-बबलमध्ये राहत आहे. त्यापैकी कोणालाही संसर्ग झालेला नाही. कोरोनाच्या संकटामुळे दोन्ही बोर्डांनी समंजसपणे मालिका चार दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

असे आहे नवे वेळापत्रक
यापूर्वी १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेची सुरुवात आता १८ जुलै रोजी होणार असल्याची अधिकृत घोषणा बीसीसीआयने केली आहे. तर २९ जुलै रोजी तिसऱ्या व शेवटच्या टी२० सामन्याने हा दौरा संपन्न होणार आहे. दौऱ्यावर एकूण तीन वनडे व तीन टी२० सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण्यात येतील.

वनडे मालिका –
१८ जुलै – पहिला वनडे सामना, कोलंबो
२० जुलै – दुसरा वनडे सामना, कोलंबो
२३ जुलै – तिसरा वनडे सामना, कोलंबो

टी२० मालिका –
२५ जुलै – पहिला टी२० सामना, कोलंबो
२७ जुलै – दुसरा टी२० सामना, कोलंबो
२९ जुलै – तिसरा टी२० सामना, कोलंबो

महत्त्वाच्या बातम्या – 

लॉर्ड्सवर हसन अलीचा ‘मोठा’ कारनामा, पाच बळींसह केली ‘अशी’ ऐतिहासिक कामगिरी

इंग्लंडने पाकिस्तानला पुन्हा एकदा पाजले पराभवाचे पाणी, सोप्या विजयासह मालिका घातली खिशात

‘तेव्हा टीम इंडियामध्ये अन् आता विम्बल्डनमध्ये घेतली माझी जागा’, कार्तिकच्या ‘त्या’ फोटोवर रोहन गावसकरची कमेंट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---