येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला आशिया चषकाव्यतिरिक्त १० टी२० सामने खेळायचे आहेत. यादरम्यान आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ कसा असावा, याबद्दल माजी क्रिकेटपटू मते मांडताना दिसत आहेत. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि श्रीकांत यांनीही टी२० विश्वचषकासाठी भारताचा संभावित संघ कसा असावा, याबद्दल चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी२० सामना सुरू असाताना या शास्त्री (Ravi Shastri) आणि श्रीकांत (Srikanth) यांच्यात या विषयावर चर्चा झाली. यादरम्यान आपले माजी सहकारी आणि भारतीय संघाचे निवडकर्ते चेतन शर्मा यांच्याबद्दल मोठी टिप्पणी केली. श्रीकांत यांनी चेतन शर्मा यांना टी२० विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) योग्य संघ निवडायला सांगितले. यासाठी कोणत्या सल्ल्याची गरज असल्यास चेतन शर्मा (Indian Team Chief Seletor) श्रीकांत यांना कोणत्याही वेळी फोन करू शकतात, असेही त्यांनी म्हटले.
श्रीकांत म्हणाले की, “ए चेतु (Chetan Sharma), यावेळी अचूक संघ निवड. काही सल्ला पाहिजे असल्यास मला कॉल कर. रवी शास्त्रीलाही कॉल कर. आम्ही दोघे तुला चांगले सल्ले देऊ.”
भारतीय संघाचे माजी निवडकर्ते श्रीकांत पुढे म्हणाले की, “सध्या खेळाडूंसोबत जे प्रयोग केले जात आहेत, ते योग्य आहेत. परंतु पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या आशिया चषकापर्यंतच भारताच्या टी२० विश्वचषक २०२२ साठीच्या संघाची निवड करावी लागणार आहे. त्यामुळे सध्या आशिया चषकासाठी भारतीय संघ कसा असेल, यावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल.”
दरम्यान भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने ६८ धावांनी जिंकला असून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहित होणार आणखीनच हीट! दोन वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराला टाकणार मागे
CWG Breaking: अवघ्या १९ व्या वर्षी जेरेमीने रचला इतिहास! जिंकले कॉमनवेल्थ गोल्ड
पाकिस्तानच्या दिग्गजाने कोहलीबाबत केले विराट वक्तव्य! म्हणाला, ‘त्याला एशिया कपमध्ये…’