---Advertisement---

श्रीलंका बोर्डाने घोषित केली भारत-श्रीलंका सामन्यांची वेळ, पाहा किती वाजता सुरू होणार मॅच?

On: मंगळवार, जुलै 13, 2021 8:06 AM
---Advertisement---

भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहेl. या दोन्ही संघांमध्ये १३ जुलैपासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार होता. परंतु श्रीलंका संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. या मालिकेला येत्या १८ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. मालिकेतील वेळापत्रकात बदल झाल्यामुळे सामना सुरू होण्याच्या वेळातही महत्वाचा बदल करण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊया, किती वाजता सुरू होतील भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामने?

श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर आणि डेटा विश्लेषक जीटी निरोशन यांना कोरोनाची लागण झाली होती. ज्यामुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच सामना सुरू होण्याच्या वेळातही महत्वाचा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी वनडे मालिकेतील सामने २ वाजून ३० मिनिटांनी सुरू होणार होते. परंतु वेळापत्रकात बदल झाल्यानंतर हे सामने ३ वाजता सुरू करण्यात येणार आहेत. तसेच टी-२० मालिकेतील सामने ७ वाजता सुरू होणार होते. परंतु वेळापत्रकात बदल झाल्यानंतर हे सामने ८ वाजता खेळले जाणार आहेत.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये असल्यामुळे बीसीसीआयने द्वितीय श्रेणीचा संघ श्रीलंका दौऱ्यावर पाठवला आहे. या संघाचे कर्णधारपद शिखर धवनच्या हाती देण्यात आले आहे. तर संघाचे उपकर्णधारपद भुवनेश्वर कुमारच्या हाती देण्यात आले आहे. युवा खेळाडूंनी भरलेला भारतीय संघ मैदानात येऊन चांगली कामगिरी करण्याठी सज्ज होत आहे. श्रीलंका क्रिकेटने नुकताच आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, हार्दिक पंड्या हे तुफान फटकेबाजी करताना दिसून आले होते.

असे असेल भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका 
१)पहिला वनडे सामना – १८ जुलै
२) दुसरा वनडे सामना – २० जुलै
३) तिसरा वनडे सामना – २३ जुलै
टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २५ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २७ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २९ जुलै

असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज :
ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग

महत्वाच्या बातम्या –

भारतीय महिलांच्या आनंदावर विरजण, सामना विजयानंतर आयसीसीने ठोठावला दंड; वाचा कारण

इंग्लंडच्या क्रिकेट वर्तुळात कोरोनाचा हाहाकार; ‘या’ संघाचा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सामनाही रद्द

सानिया मिर्झाच्या आधी हैदराबादमधील मुलीबरोबर शोएब मलिकने केला होता निकाह? 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---