---Advertisement---

सिडनी कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! शतक झळकावणाऱ्या फलंदाजाला कोरोनाची लागण

On: शुक्रवार, डिसेंबर 31, 2021 10:03 AM
Australia
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England)  या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची ऍशेस मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या ३ सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवत ३-० ची विजयी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील चौथा कसोटी सामना ५ जानेवारी पासून सिडनीच्या मैदानावर पार पडणार आहे. हा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाला एक मोठा धक्का बसला आहे. 

ऑस्ट्रेलिया संघाचा अनुभवी आणि चांगल्या फॉर्ममध्ये असलेला फलंदाज ट्रेविस हेडला (Travis head)  कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामुळे तो सिडनी कसोटीतून बाहेर झाला आहे. त्यामुळे मिचेल मार्श, निक मॅडिन्सन आणि जोश इंग्लिस यांचा ऑस्ट्रेलियन संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. हेडने पहिल्या ऍशेस कसोटीत शतक झळकावले होते. (Travis head corona positive)

याआधी इंग्लंडचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड हे देखील कोरोनामुळे सिडनी कसोटीत सहभागी होणार नाहीये. तसेच सामनाधिकारी डेविड बून यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे ते देखील सिडनी कसोटीतून बाहेर झाले आहेत. आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी सदस्य स्टीव्ह बर्नार्ड हे चौथ्या कसोटीसाठी सामनाधिकारी म्हणून त्यांची जागा घेतील.

अधिक वाचा – तिसऱ्याच दिवशी बॉक्सिंग डे कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिका घातली खिशात; इंग्लंडचा डावाने पराभव

तसेच मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलिया संघाने या संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी करत इंग्लंड संघाला पूर्णपणे बॅकफूटवर टाकले आहे. इंग्लंड संघाने या संपूर्ण मालिकेत निराशाजनक कामगिरी केली आहे. ज्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी देखील इंग्लंड संघावर टीका केली आहे.

या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून विजय मिळवला होता, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने २७५ धावांनी आपल्या नावावर केला होता. तसेच नुकताच संपन्न झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने १ डाव आणि १४ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्वाच्या बातम्या : 

मेगा लिलावापूर्वी वॉर्नर अन् हैदराबादमध्ये छेडले ट्वीटर वॉर, अखेर फ्रँचायझीच्या उत्तराने क्रिकेटरची बोलती बंद

भारताविरुद्धच्या पराभवानंतर स्टार क्रिकेटर क्विंटन डी कॉकने कसोटी क्रिकेटला केला अलविदा

हे नक्की पाहा :

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---