दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (दि. 17 सप्टेंबर) जोहान्सबर्गच्या द वाँडरर्स स्टेडिअम येथे खेळला गेला. हा दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूचा वनडे कारकीर्दीतील आपल्या मायदेशातील अखेरचा सामना होता. तो वनडेतून निवृत्त होत आहे. अशात निवृत्तीविषयी त्याने मोठे विधानही केले आहे. कोण आहे तो खेळाडू? जाणून घेऊयात…
घरच्या मैदानावरील कारकीर्दीतील अखेरचा वनडे सामना
आपल्या कारकीर्दीतील मायदेशातील अखेरचा वनडे सामना खेळणारा खेळाडू इतर कुणी नसून दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाचा विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) आहे. डी कॉक याने मागील काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, तो आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. विशेष म्हणजे, डी कॉक हा अवघ्या 30 वर्षांचा आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मायदेशातील अखेरचा वनडे सामना खेळला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 122 धावांनी विजय मिळवला. तसेच, मालिका 3-2ने खिशात घातली.
निवृत्तीविषयी काय म्हणाला डी कॉक?
क्विंटन डी कॉक याने निवृत्तीविषयी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “माझे शरीर म्हणतंय मी 40 वर्षांचा आहे. माझे ओळखपत्र म्हणतंय मी 31चा आहे आणि मी नेहमीच मानसिकरीत्या 20 वर्षांचा असल्यासारखा वागण्याचा प्रयत्न करतो.”
वनडे कारकीर्द
जानेवारी 2013मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी वनडे पदार्पण करणाऱ्या डी कॉक याने आतापर्यंत एकूण 145 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 45च्या सरासरीने 6165 धावांचा पाऊस पाडला आहे. या धावा करताना त्याच्या नावावर 17 शतके आणि 30 अर्धशतकांची नोंद आहे. यादरम्यान 178 ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या राहिली आहे. तसेच, डी कॉकने कारकीर्दीत एकूण 713 चौकार आणि 97 षटकारांचीही बरसात केली आहे.
क्विंटन डी कॉक सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतील पाचवा म्हणजेच अखेरचा सामना खेळत आहे. या मालिकेत त्याने 5 डावात 1 अर्धशतकासह 200हून धावांचाही पाऊस पाडला आहे. (Star cricketer Quinton De Kock playing his final ODI at the home soil today at the age of just 30)
हेही वाचा-
Final: ‘हिटमॅन’ घडवणार इतिहास! फक्त पाऊसच रोखू शकतो रोहितचा ‘हा’ Record, श्रीलंकेच्याही हातात नाही काही
रियान परागचा मोठा खुलासा! म्हणाला, ‘विराट कोहलीचा शेवटचा संपूर्ण कॉल रेकॉर्ड केला, कारण…’