कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. त्याचबरोबर तो भारतातही वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारतात थैमान घातलेल्या या व्हायरसला थांबविण्यासाठी क्रीडा जगतातून मोठ्या प्रमाणावर मदत केली जात आहे.
यामध्ये भारतीय कबड्डी संघाचा चढाईपटू पवन कुमार शेरावत कोविड-१९ विरुद्धच्या लढाईसाठी पंतप्रधान मदत निधी (PM Cares Fund) मध्ये मदत केली आहे. पवन ने मदतीची रक्कम न सांगता निधी दिला आहे.
https://www.instagram.com/p/B-tp5_qpGhw/?utm_source=ig_web_copy_link
कोरोना व्हायरसबद्दल पवनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून लोकांना आवाहन केले आहे. यामध्ये तो म्हणाला की, “मी पंतप्रधान निधी (PM Cares Fund) साठी मदत केली आहे, मला आशा आहे आपण ही कराल”, चला एकत्र येऊन या परिस्थिती वर मात करूया.